पुणे (22 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजचा पहिला सामना पालघर विरुद्ध मुंबई शहर यांच्यात झाला. प्रमोशन फेरीत पालघर संघ 2 विजय व 1 पराभव सह तिसऱ्या स्थानी होता. तर मुंबई शहर संघ 3 पराभव सह गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. दोन्ही संघानी सावध खेळ करत सामन्याला सुरुवात केली. दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पहिला 9 मिनिटाच्या खेळात सामना 3-3 असा बरोबरीत सुरू होता.
पालघर संघाने सामन्यादरम्यान खेळाडू बदली करत प्रतिक जाधवला मैदानात उतरवले. प्रतिक जाधव ने संधीचा फायदा घेत आपला आक्रमक खेळ करत गुण मिळवले. मध्यांतरापुर्वी पालघर संघाने मुंबई शहराला ऑल आऊट करत सामन्यात आघाडी मिळवली. मध्यंतराला पालघर संघाकडे 13-08 अशी आघाडी होती. मध्यंतरा नंतर सामना अत्यंत चुरशीचा झाला. पालघर संघाने आज पुन्हा एकदा विरुद्ध संघाच्या चढाईटपटूंचे 3 सुपर टॅकल करत संघावर लोनची नामुष्की टाळली.
सामन्याची शेवटची 4 मिनिटं शिल्लक असताना पालघर संघाकडे 28-18 अशी आघाडी होती. अखेर पर्यत मुंबई शहराला पालघर संघाला ऑल आऊट करता आले नाही. बचावफळीच्या चुकांन मुळे व चढाईपटूंच्या सुमार कामगिरी मुळे मुंबई सलग चौथा सामना गमावला. पालघर कडून प्रतिक जाधवने सुपर टेन केला तर अभिनय सिंग ने 3 सुपर टॅकल व चढाईत 3 गुण मिळवत पालघर संघाला तारले. पालघर संघाने 34-22 असा विजय मिळवला.
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- अभिनय सिंग, पालघर
कबड्डी का कमाल – अभिनय सिंग, पालघर
महत्वाच्या बातम्या –
IPL च्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि दिल्ली आमने-सामने, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
IPL 2024 । धोनी आता खऱ्या अर्थाने बनला महान विकेटकिपर! कुमार संगकाराला टाकले मागे