Paris Olympics: समारोप समारंभ कधी, कोठे किती वाजता; पाहा सगळं काही एका क्लिकवर

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली असून समारोप समारंभ 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेला 26 जुलै पासून सुरुवात झाली होती. ज्याचं सीन नदीकाठी उद्घाटन समारंभ पार पठला होता.आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली असून क्लोजिंग सेरेमनी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळी, सीन नदीवर ऍथलीट्सची परेड आयोजित करण्यात आली होती.  तर आता क्लोजिंग सेरेमनीही कश्या पद्धतीने होणार, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. अखेर हा क्लोजिंग सेरेमनी कधी सुरू होणार आणि त्यात कोणत्या खास गोष्टी पाहायला मिळतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीद्वारे जाणून घेऊया.

यंदाचा पॅरिस ऑलिम्पिकचा क्लोजिंग सेरेमनी फ्रान्समधील सर्वात मोठ्या स्टेडियम स्टेड डी फ्रान्समध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी 80 हजार लोक बसू शकतात. हा सोहळा भारतात 12 ऑगस्ट रोजी सकाळी 12.30 वाजता सुरू होईल, जो किमान 2 तास चालण्याची अपेक्षा आहे. क्लोजिंग सेरेमनीच्या आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनानुसार पॅरिस ऑलिम्पिकच्या क्लोजिंग सेरेमनीत 100 हून अधिक कलाकार परफॉर्म करणार आहेत.

उद्घाटन समारंभात पी.व्ही. सिंधू आणि शरत कमल यांना भारतीय संघाचे ध्वजवाहक बनवण्यात आले होते. आता क्लोजिंग सेरेमनी भारतीय संघाचे ध्वजवाहक मनू भाकर आणि पीआर श्रीजेश असतील. मनूने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 2  कांस्यपदके जिंकली आहेत, तर पीआर श्रीजेश कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा हिस्सा होता. यंदाची ऑलिम्पिक त्याच्या करिअरची शेवटची स्पर्धा होती. या विजयानंतर त्याने निवृत्ती घेतला आहे. भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या भारताच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, यंदाची ऑलिम्पिक भारतासाठी साधारण होती. भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत एकूण 6 पदके जिंकली. ज्यामध्ये 5 कांस्य तर 1 राैप्य पदकाचा सामवेश आहे.

हेही वाचा-

Paris Olympics: यंदाच्या ऑलिम्पिक मोहीमेत भारताची इतक्या पदकांची कमाई; सर्वोत्तम कामगिरीत दुसऱ्या स्थानी
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या नदीमच्या नावावर बनणार ‘स्पोर्ट्स सिटी’, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा
उपांत्यपूर्व सामना 1-1 ने बरोबरीत राहूनही पराभूत झाली रितिका! काय आहे नियम?

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.