विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्मात होते. आरसीबीने हंगामाची सलग चार सामने जिंकत झोकात सुरुवात केली होती. त्यानंतर देखील एक दोन पराभव पत्करावे लागले असले तरी आपला फॉर्म कायम राखला होता.
आरसीबीच्या यशात यंदा महत्वाचा वाटा होता तो गोलंदाजांचा. त्यांच्या हर्षल पटेलने शानदार गोलंदाजी करतांना यंदाच्या हंगामात ७ सामन्यात १७ विकेट्स पटकावत पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली होती. मात्र याशिवाय यात मोलाचा वाटा उचलला तो वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने. सिराजने आरसीबीच्या गोलंदाजी फळीचे यंदा समर्थपणे नेतृत्व केले. याच कामगिरीबद्दल भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने सिराजचे भरभरून कौतुक केले आहे.
सिराजची कामगिरी सगळ्यात लक्षवेधी
पार्थिव पटेलने सिराजला यंदाच्या आयपीएलची सगळ्यात लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल शाबासकी दिली आहे. पार्थिवने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात सिराजच्या कामगिरी बद्दल सविस्तर चर्चा केली. यात त्याने सिराजने शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये टाकलेल्या सातत्यपूर्ण यॉर्कर्सचे कौतुक केले.
पार्थिव म्हणाला, “आत्तापर्यंत सगळेच म्हणायचे की सिराज नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी करतो. पण शेवटच्या षटकांमध्ये धावा देतो. यंदा त्याने ही गोष्ट खोडून काढत शेवटच्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी केली. विशेषतः यॉर्कर्सचा उत्तम ऊपयोग केला. त्यामुळेच सिराज हा यंदाच्या आयपीएलचा सगळ्यात लक्षवेधी खेळाडू आहे असं मला वाटतं.”
पार्थिव पुढे म्हणाला, “सिराजने शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्यात माहीर असलेल्या आंद्रे रसेल आणि रिषभ पंत सारख्या फलंदाजांनी लगाम घातला. त्याने आरसीबीसाठी सामने जिंकण्यात निर्णायक भूमिका बजावली. म्हणूनच यंदाच्या आयपीएल मध्ये तो सगळ्यात शानदार कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे, असं मला वाटतं.” सिराजने यंदाच्या हंगामात ७ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या. सिराजच्या विकेट्सच्या खात्यात फारसा मोठा आकडा नसला तरी धावा रोखण्यात त्याने संघाला दिलेले योगदान यंदा निर्णायक ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतप्रधानांनी स्वतः यावे आणि भारतात रस्त्यावर पडलेले मृतदेह पहावे, मायकेल स्लेटर पुन्हा बरसला
दबाव झेलता न आल्याने आईसमोर बसून रडायचा पुजारा, मग अशी केली समस्येवर मात
या ३ प्रमुख कारणांमुळे आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये झाला कोरोना व्हायरसचा शिरकाव?