ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) ऍशेसच्या पहिल्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली, पण दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या उपस्थितीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. पहिल्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती आणि तिसऱ्या दिवशी तो क्षेत्ररक्षणासाठी उपस्थित नव्हता. आता त्याच्या दुखापतीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने महत्त्वाची माहिती दिली आहे.
कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने वॉर्नर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी देखील उपस्थित असणार आहे, अशी पुष्टी केली आहे. (Ashes Series 2021-22)
डेविड वॉर्नरला पहिल्या सामन्यादरम्यान गुरुवारी (९ डिसेंबर) बेन स्टोक्स आणि मार्क वुड यांनी छातीवर काही चेंडू टाकले होते आणि त्याच वेळी वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यानंतर वॉर्नचा एक्स-रे काढला गेला होता, पण त्यामध्ये काही गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर आढळले नाही. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया संघाचा नवीन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने या गोष्टीची पुष्टी केली आहे की, वॉर्नर दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील खेळणार आहे.
वॉर्नरने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघासाठी महत्वाची खेळी केली होती. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासाठी १७६ चेंडूत ९४ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅविस हेडने १४८ चेंडूत १५२ धावांची तुफान खेळी केली. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्नस लॅब्यूशेनने देखील ७४ धावांचे मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात तब्बल ४२५ धावा केल्या.
तत्पूर्वी, सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार पॅट कमिन्सह इतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर इंग्लंड संघाने अवघ्या १४७ धावांवर शरणागती पत्करली होती. पहिल्या डावात पॅट कमिन्सने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानतंर इंग्लंड संघ दुसऱ्या डावात २९७ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या डावात विजयासाठी अवघ्या २० धावांची आवश्यकता होता, ज्या धावा त्यांनी फक्त ५.१ षटकात केल्या. उभय संघातील दुसरा ऍशेस सामना ऍडिलेडमध्ये १६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
गॅबा कसोटीत ८९ धावांची खेळी करणाऱ्या रुटची पाँटिंगशी बरोबरी, आता नजर क्लार्कच्या विक्रमावर
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच होणार असं, ऍशेस मालिकेतील २ सामने खेळवले जाणार दिवस-रात्र स्वरुपात
मलानची विकेट घेताच लायनची ३ मोठ्या विक्रमांना गवसणी; अश्विन, मुरलीधरनच्या पंक्तीत स्थान