भारतात सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. या कठिण परिस्थित पुन्हा एकदा लॉकडाऊनची परिस्थितीही उद्भवली आहे. असे असताना सध्या भारतात सुरक्षिततेची काळजी घेत इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम सुरु आहे. पण भारतातील बिकट परिस्थिती पाहून काही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी या हंगामातून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे खेळाडू माघार घेत असताना दुसरीकडे मात्र, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्सने पंतप्रधान मदत निधीला पैसे दान केले आहेत.
कमिन्सने तो ५०००० डॉलर दान करत असल्याचे ट्विट करुन सांगितले आहे. त्याने हे दान प्रामुख्याने भारतीय हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा खरेदीसाठी केले असल्याचेही त्याने सांगितले आहे.
तसेच त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलेल्या संदेशात असे म्हटले आहे की त्याला भारत देश आवडतो. तसेच तो आजपर्यंत भेटलेल्या लोकांपैकी भारतीय लोक हे चांगले असल्याचेही त्याने म्हटले आहे. एवढेच नाही तर त्याने असेही म्हटले आहे की भारतीय सरकारने या कठीण काळातही आयपीएल सुरु ठेवावी, कारण एकीकडे कठीण परिस्थिती असताना आयपीएलमुळे काही तास भारतीय लोकांना आनंद देतात.
तसेच त्याने म्हटले आहे की लोकांनी त्यांच्या भावना कृतीतून व्यक्त करायला हवा, ज्यामुळे इतरांच्या आयुष्यात थोडी आशा निर्माण होईल. तसेच कमिन्सने आशा व्यक्त केली आहे की त्याच्या देणगीमुळे एखाद्याच्या आयुष्यात आनंद येईल.
https://twitter.com/patcummins30/status/1386624033936969730
आयपीएलमध्ये कोलकाता संघाचा भाग आहे कमिन्स
कमिन्स सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. त्यामुळे तो १४ व्या आयपीएल हंगामासाठी भारतातच आहे. त्याने या हंगामात आत्तापर्यंत ५ सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एका अर्धशतकासह त्याने ८२ धावा केल्या आहेत.
या खेळाडूंनी घेतली माघार
भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहातो राजस्थान रॉयल्सच्या अँड्र्यू टाय, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या केन रिचर्डसन आणि ऍडम झम्पा यांनी आयपीएल २०२१ मधून माघार घेतली असून ते ऑस्ट्रेलियाला परतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कोलकाताला पंजाबविरुद्ध सूर गवसणार? ‘अशी’ असेल राहुल-मॉर्गनच्या संघांची प्लेइंग इलेव्हन
भारीच की! सौंदर्याची खाण असलेली समालोचिका ‘या’ लीगच्या दर्शकांना आपल्या वाणीतून करणार मंत्रमुग्ध
SRHच्या गोलंदाजाने मारला अप्रतिम सिक्सर, DCची बॉलिंग बघून लोटपोट झाली ‘मिस्ट्री गर्ल’; पाहा Video






