fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लाॅकडाऊनदरम्यान महान खेळाडूने केली आत्महत्या

Pavle-Jovanovic-2006-Olympic-Bobsledder-Dies-By-Suicide

हिवाळी ऑलिपिंक्समध्ये २००६मध्ये बॉबस्ले (बर्फावर खेळला जाणार खेळ) खेळात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पावले योवानोविच या खेळाडूने आत्महत्या केली आहे. तो ४३ वर्षांचा होता.

याची माहिती शनिवारी अमेरिकेच्या बॉबस्ले आणि स्केलेटन महासंघाने दिली आहे.

योवानोविचचे एकेवेळचे संघसहकारी व सध्याचे महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरोन मॅकग्वायरने यावेळी सांगितले की, पावले योवानोविचच्या आत्महत्येमुळे मोठे नुकसान झाले आहे. पावले बाॅबस्लेमधील एक मोठा खेळाडू होता. त्याने संघसहकारी, प्रशिक्षक व प्रतिस्पर्ध्यांची मने जिंकली होती.  ज्या लोकांबरोबर पावलेने वेळ घालवला, ते त्याला कधीही विसरु शकणार नाहीत.

You might also like