---Advertisement---

PBKS vs GT; श्रेयसची वादळी तर शशांकची धडाकेबाज खेळी, गिलच्या टायटन्स समोर 244 धावांचे लक्ष्य

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील पाचवा सामना आज 25 मार्च खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमने सामने आहेत. टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना पंजाब किंग्जने विक्रमी 243 धावसंख्या रचली आहे. ज्यात श्रेयस अय्यर शशांक सिंग यांनी तुफानी खेळी खेळली.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 243 धावा केल्या. पंजाबकडून श्रेयसने 42 चेंडूत 97 धावा काढत नाबाद परतला. त्याच वेळी, शशांकने 16 चेंडूत 44 धावांची तुफानी खेळी खेळली. मात्र कर्णधार श्रेयस अय्यरचे केवळ 3 धावांनी शतक हुकले.

तत्तपूर्वी सलामीला आलेल्या प्रियांश आर्यने 47 धावांची आक्रमक खेळी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. मात्र त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. यानंतर तिसऱ्या क्रमांकवर आलेल्या अय्यरने शानदार फलंदाजी केली. शेवटी शशांक सिंगच्या फिनिशिंग टचने संघ मर्यादित 20 षटकात 243 धावांचा डोंगर उभारला आहे. गुजरातकडून गोलंदाजीत साई किशोरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

पंजाब – प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अझमतुल्लाह उमरझाई, मार्को जानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

गुजरात – शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुधरसन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---