---Advertisement---

PBKS vs KKR: ‘ती’ चूक टळली अन् पंजाबनं कोलकाताच्या खिश्यातून विजय खेचून आणला!

---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 31 व्या सामन्यात, पंजाबने एका रोमांचक कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकात्याचा 16 धावांनी पराभव करून नवा इतिहास रचला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर यजमान पंजाब संघाचा डाव फक्त 111 धावांवर कोसळला. पंजाबच्या 111 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता 15.1 षटकात 95 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, पंजाबने आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा मोठा पराक्रम केला.

पंजाबच्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांनाही संघर्ष करावा लागला. कोलकात्याचे सलामीवीर सुनील नारायण आणि क्विंटन डी कॉक पहिल्या दोन षटकांतच बाद झाले. यानंतर, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी जबाबदारी सांभाळली आणि धावसंख्या 62 धावांपर्यंत नेली. यानंतर पंजाबचा फिरकीपटू चहलने आपल्या फिरकी जादूचा वापर करत रहाणे आणि रघुवंशीला त्याच्या सलग दोन षटकांत बाद केले. यानंतर, 11 व्या षटकात व्यंकटेश अय्यर मॅक्सवेलचा बळी ठरला. कोलकाताचा अर्धा संघ 74 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतरही केकेआरच्या कोणत्याही फलंदाजाला फार काळ क्रीझवर टिकता आले नाही. 12 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या चहलने रिंकू सिंग आणि रमनदीप सिंग यांना सलग चेंडूंवर बाद करून कोलकाताला बॅकफूटवर आणले.

मार्को जॅन्सनने हर्षित राणाला बाद करून पंजाबच्या विजयाच्या आशा उंचावल्या. वैभव अरोराच्या रूपाने कोलकात्याला नववा धक्का बसला. यानंतर, आंद्रे रसेलने काही मोठे फटके खेळून सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मार्को जॅन्सनने शेवटचा बळी घेतला आणि पंजाबला रोमांचक विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---