पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ज्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तान संघ शान मसूदच्या नेतृत्वाखाली बांग्लादेश विरुद्ध खेळेल. पीसीबाने मात्र या दरम्य्यान वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रीदीला मोठा धक्का दिला आहे. शाहिनला संघाच्या उपकर्णधार पदावरुन हटवले आहे. त्याच्या जागी पाकिस्तानने सौद शकीलकडे जबाबदारी सोपवली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू नुकतेच वादात सापडले आहेत. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये फूट पडली आहे. त्याचाच परिणाम संघाच्या कामगिरीवर पहायला मिळाला. पीसीबीने या सर्व मुद्दयांवर नजर ठेवून बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी संघात मोठे उलटफेर केले आहे. संघाचा उपकर्णधार शकीलला बनवण्यात आले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदाला या पदावरुन हटवले आहे. माजी कर्णधार बाबर आझम देखील संघाचा भाग आहे. तो बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामना खेळेल.
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील कसोटी सामन्यातील पहिला सामना रावलपिंडी येथे खेळवला जाईल. हा सामना 21 ऑगस्ट रोजी होईल. तर दुसरा सामना 30 ऑगस्ट रोजी कराची येथे खेळवला जाईल.
खरं तर, शाहीन पाकिस्तानच्या सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत 29 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान 113 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 6 विकेट आणि 51 धावा ही शाहीनची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने 53 एकदिवसीय सामन्यात 104 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच त्याने 70 टी-20 सामन्यात 96 विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघ- शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक) , नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन आफ्रिदी
हेही वाचा-
वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! कर्णधार रोहितने दिला धक्कादायक इशारा
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, ‘विनेश फोगट’ला मिळणार या सर्व सुविधा, जाणून घ्या
पॅरिस ऑलिम्पिक वादाच्या भोवऱ्यात; शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय खेळाडूंची हकालपट्टी