भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान क्रिकेट विश्वचषक व क्रिकेट मालिकांबाबत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषक यामध्ये पाकिस्तान संघाच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता याच मुद्द्यावर एक सकारात्मक बातमी समोर येत आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने विश्वचषकासाठी भारतात येण्याचे मान्य केले असून, त्यासाठी त्यांनी केवळ एक अट ठेवली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
सध्या पीसीबी व बीसीसीआय समोरासमोर आलेले आहेत. पाकिस्तानमध्ये नियोजित आशिया चषकासाठी भारतीय संघाने पाकिस्तानात यावे अशी पीसीबीने इच्छा व्यक्त केली होती. भारतीय संघ पाकिस्तानात न आल्यास पाकिस्तान संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही अशी धमकी पीसीबीने आयसीसीला दिलेली. आशिया चषक ऑगस्ट महिन्यात तर विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर खेळला जाईल.
त्यानंतर चर्चेअंती आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान आपल्या मागणीवर ठाम असल्याचे वृत्त समोर आलेले. मात्र, आता मिळत असलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने वनडे विश्वचषकासाठी भारतात येण्याकरिता आयसीसीला होकार दिला आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात येण्याआधी पाकिस्तानची एक टीम भारतात येऊन सुरक्षेची व्यवस्था पाहिलं. त्यांचे समाधान झाल्यास पाकिस्तान संघ भारतात खेळेल. अन्यथा काही स्थळे बदलण्यात येतील.
पाकिस्तान सरकारने 2016 टी20 विश्वचषकावेळी देखील अशाच प्रकारे मागणी केली होती. त्यावेळी सुरक्षा समितीने सुचवल्यानंतर धर्मशाला येथील सामने बदलून कोलकत्ता येथे खेळवण्याचे नक्की झाले होते. त्यामुळे आता जवळपास सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
(PCB Sent Confermation For ODI World Cup To ICC Just Check Security)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! क्रिकेट खेळताना झालेल्या वादात 12 वर्षीय चिमुकल्याची हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
बझबॉलच्या जोरावर इंग्लंड ऍशेस जिंकणार? ऑस्ट्रेलियन संघाला अँडरनसचे खुले आव्हान