भारतीय क्रिकेट संघाचा व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आयसीसी) कर्णधार असलेला विराट कोहली हा क्रिकेटव्यतिरिक्त फुटबॉलचा देखील मोठा चाहता आहे. संघाच्या सरावादरम्यान तो फुटबॉल खेळताना दिसतो. त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू विराटचे चांगले मित्र देखील आहेत. इंग्लंडमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीचे मॅनेजर पेप गॉर्डीयोला यांच्याशी देखील विराटचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गॉर्डीयोला यांनी नुकतेच विराटचे आभार मानतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या कारणाने गॉर्डीयोला यांनी मानले आभार
विराट आणि गॉर्डीयोला हे अनेकदा खेळांविषयी चर्चा करताना दिसून येतात. मागील वर्षी लॉकडाऊन दरम्यान दोघांनी फुटबॉल आणि क्रिकेटवर चर्चा केली होती.
गॉर्डीयोला यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आरसीबीची जर्सी हातात पकडली आहे. त्यांनी या खाली कॅप्शन देताना लिहिले, ‘आता क्रिकेट शिकण्याची वेळ आली आहे. माझा मित्र विराट कोहलीचे या जर्सीसाठी धन्यवाद. आता तू मँचेस्टर सिटीची जर्सी वापर.’
विराटने काही दिवसांपूर्वी गॉर्डीयोला यांना आरसीबी जर्सी भेट म्हणून पाठवली होती.
https://www.instagram.com/p/CN-n9u1q-SD/?igshid=85mhfsd9o9qz
अनुभवी मॅनेजर आहेत गॉर्डीयोला
पेप गॉर्डीयोला हे क्लब फुटबॉलमधील मान्यवर मॅनेजर आहेत. गॉर्डीयोला यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघांनी युएएफए चॅंपियन्स लीग, प्रीमियर लीग, ला लीगा यांच्यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या ते मॅनेजर असलेला मँचेस्टर सिटी क्लब इंग्लिश प्रीमिअर लीग जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे.
खेळाडू म्हणून बचावपटूची भूमिका सांभाळणाऱ्या गॉर्डीयोला यांनी बार्सिलोनासाठी क्लब फुटबॉल खेळले होते. तसेच ते काही काळ स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधार देखील होते.
विराटचा आहे फुटबॉलशी जवळचा संबंध
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट फुटबॉलचा देखील मोठा चाहता आहे. त्याच्या सरावात नेहमी फुटबॉलचा समावेश असतो. काही प्रदर्शनीय सामन्यात तो फुटबॉल खेळला आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केन व भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हे त्याचे खास मित्र आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
थरारक लढतीत झिम्बाब्वेची कमाल! पाकिस्तानला अवघ्या ९९ धावांवर ऑल आउट करत मिळवला ऐतिहासिक विजय
Video: ‘सर’ जडेजाचा ‘कॉमिक अवतार’, पण नक्की कोणत्या फलंदाजाची केली नक्कल? चाहते संभ्रमात
रोहितने अखेर विराटला गाठलेच; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला चौथा फलंदाज






