प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस हा खास असतो. त्यादिवशी काहीतरी खास करण्याची त्याची इच्छा असते. त्यातही तो जर खेळाडू असेल तर त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी विशेष अशी कामगिरी करुन दाखवावी असे वाटत असते. पण हे फार कमी खेळाडूंना जमते. क्रिकेटमध्येही असे काही मोजके क्रिकेटपटू आहेत, ज्यांना वाढदिवसाच्या दिवशी चांगली कामगिरी करता आली आहे. त्यातही जागतिक क्रिकेटमध्ये असा एक गोलंदाज आहे ज्याने वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेण्याची कमाल केली आहे.
तो गोलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पीटर सिडल. तो जगातील एकमेव असा गोलंदाज आहे, ज्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात २५ नोव्हेंबर २०१०ला कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली होती. त्यावेळी सिडलने आपला २६वा वाढदिवस इंग्लंडच्या तीन फलंदाजांना सगल तीन चेंडूवर तंबूत पाठवत साजरा केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिडल सोडून कोणत्याही गोलंदाजाला आजपर्यंत वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेता आलेली नाही.
सन २०१०-११ ऍशेस मालिकेसाठी इंग्लंड संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. तेव्हा पहिला कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे झाला होता. यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, पहिल्याच दिवशी त्यांचा डाव २६० धावांत संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाकडून सि़डलने गोलंदाजी करताना पहिल्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या. ६६व्या षटकात गोलंदाजी करताना त्याने ऍलिस्टर कूक, मॅट प्रायर व स्टुअर्ट ब्राॅड यांना सलग तीन चेंडूत तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे त्याच्या नावावर वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेण्याचा विक्रम नोंदवला गेला. (Peter Siddle – Only bowler in the history of cricket to take a hat-trick on birthday.)
सिडलला दुसऱ्या डावात मात्र एकही विकेट घेता आली नाही. हा सामना पुढे अनिर्णित राहिला व ऍलिस्टर कुकला सामनावीर घोषीत करण्यात आले.
मनोरंजक लेख-
–बापरे! एमएस धोनीला कूल कॅप्टन्सीसाठी मिळाला होता सामनावीर पुरस्कार
–आणि फिल्डरला अद्भुत कामगिरीसाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच
–एक नाही दोन नाही तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती मॅन ऑफ द मॅच
–एकही विकेट, धाव किंवा झेल न घेणाऱ्या खेळाडूला जेव्हा मिळतो मॅन ऑफ द मॅच
–जेव्हा ग्राऊंड्समनला दिला होता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार