---Advertisement---

कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या फिलँडरला आयसीसीने सुनावली मोठी शिक्षा

On: सोमवार, जानेवारी 27, 2020 7:20 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये आपण पाहिले आहे की खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकी घडत असतात. तसेच खेळाडूंना त्यांच्या चुकीची शिक्षाही देण्यात येते. असाच एक वाद रविवारी (26 जानेवारी) वंडरर्स स्टेडियम (The Wanderers Stadium) जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (South Africa vs England) संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात घडला.

या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू वर्नोन फिलँडरने (Vernon Philander) इंग्लंजचा फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler) बाद झाल्यानंतर त्याच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला होता.

त्यामुळे आयसीसीने रविवारी फिलँडरला सामना शुल्काच्या 15 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याला एक डेमिरिट पाॅइंटही देण्यात आला आहे.

“वंडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आयसीसी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे फिलँडरला सामनाशुल्काच्या 15 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे,” असे आयसीसीने सांगितले आहे.

फिलँडरला हा दंड कलम 2.5 नुसार आचारसंहितेचा भंग केल्यामुळे करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात जोस बटलरने फिलँडरबद्दल अपशब्दाचा वापर केला होता. त्यावेळी बटलरलाही सामना शुल्काच्या 15 टक्के दंड आणि 1 डिमिरिट पाँइंट देण्यात आला होता. 

सध्या जोहान्सबर्ग येथे सुरु असलेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामना फिलँडरचा शेवटचा कसोटी सामना आहे. या सामन्यापूर्वी त्याने कारकिर्दीत 66 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 1765 धावा केल्या आहेत. तसेच 222 विकेट्स घेतल्या आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1221734632644759552

https://twitter.com/Maha_Sports/status/1221719677098790913

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---