इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा (आयपीएल) हंगाम संपला असून आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकटचे सामने सुरू झाले आहेत. भारतीय चाहते मागील वर्षी झालेला टी२० विश्वचषक कधीच विसरणार नाही. त्यामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारत उपांत्य फेरीत देखील पोहोचला नव्हता. तसेच त्यांना पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून दारूण पराभव स्विकारावा लागला होता.
यावर्षीचा टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. सध्या रोहित शर्मा याला भारतीय संघाचे कर्णधारपद दिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी करावी, अशी आशा भारतीय चाहते करत आहे.
अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर टी२० विश्वचषकाचा सोळा जणांचा संघ घोषित केला. यामध्ये त्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याचे कौतुक केले आहे. तर त्यालाच भारतीय संघाचे नेतृत्वपदही दिले आहे.
या संघात चोप्राने विराट (Virat Kohli) आणि रोहित (Rohit Sharma) या दोघांनाही वगळले आहे. तसेच यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत यालाही संघात स्थान दिले नाही. पंधराव्या आयपीएल (IPL) हंगामात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये पोहोचले नव्हते. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभूत झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकटेमध्ये उत्तम कामगिरी करणारे विराट, रोहित आणि रिषभ हे तिघेही यंदाच्या आयपीएलमध्ये प्रदर्शनाबाबत खाली घसरले. त्यामुळे विराट-रोहितवर चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. त्यातच त्यांच्यावर काही माजी खेळाडूंनी टिका केली तर काहींनी त्यांची पाठराखण केली आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकाआधी तरी निदान विराट-रोहित यांनी फलंदाजीत सूर गवसला पाहिजे अशी मागणी चाहत्यांनी करत आहेत.
आयपीएलमध्ये काहींनी चांगली कामगिरी केली आहे. तर आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका विश्वचषकासाठी उपयोगी ठरणार आहे.
आकाश चोप्राने टी२० विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, मोहमद शमी, आवेश खान, कृणाल पंड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंह, दीपक हुडा, कुलदिप यादव, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचे ठरले ठिकाण! पाहा कोणत्या मैदानावर रंगणार अंतिम सामना
प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा, चाहत्याला ग्रेटभेट देत जिंकले हृदय