रोहित शर्मा शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून मैदानात उतरला होता. तो या सामन्यात ११ धावा करून बाद झाला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २४ धावांनी पराभव झाला.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या याला टॉसच्या वेळी रोहित शर्माबाबत प्रश्न करण्यात आला होता. मात्र त्यानं स्पष्ट उत्तर दिलं नव्हतं. आता यावर संघाचा फिरकी गोलंदाज पीयूष चावला याची प्रतिक्रिया आली आहे. त्यानं सामना झाल्यानंतर सांगितलं की, रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का खेळला.
पीयूष चावला म्हणाला, “रोहित शर्माच्या पाठीत थोडं दुखत होतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. रोहितला फिल्डिंगला यासाठी पाठवण्यात आलं नाही, कारण त्याला थोडा आराम मिळावा. मुंबई इंडियन्सची मेडिकल टीम रोहितबाबत कोणताही धोका पत्कारू इच्छित नाही.”
आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब राहिली आहे. रोहितबाबत बोलायचं झालं तर, त्यान काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली, मात्र गेल्या काही सामन्यांपासून त्याचाही फॉर्म गेला आहे. आता त्याच्या पाठीचं दुखणं संघाचं टेंशन आणखी वाढवू शकतं. रोहितच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबी इंडियन्सचा पुढील सामना ६ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे.
मुंबई इंडियन्सचे आता ३ सामने बाकी आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर संघ पुन्हा एकदा कोलकाताविरुद्ध मैदानावर उतरेल. हा सामना ११ मे रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर लखनऊविरुद्ध शेवटचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना १७ मे रोजी खेळला जाईल. मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळले, ज्यापैकी संघाला फक्त ३ सामन्यांमध्ये विजय मिळाला. मुंबईला ८ सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती! जाणून घ्या उत्पन्नाचा स्रोत काय?
माथिशा पाथिरानानं धोनीला दिला वडिलांचा दर्जा; म्हणाला, “धोनीमुळे मी…”