आर अश्विनच्या (R Ashwin) नेतृत्वाखाली दिंडीगुल ड्रॅगन्सनं 6 विकेटनं विजय मिळवला आणि त्यांचं पहिलं तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) विजेतेपद जिंकलं. त्यांनी रविवारी (4 ऑगस्ट) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीएनपीएल 2024च्या फायनल सामन्यात गतविजेत्या लायका कोवई किंग्स संंघाचा धुव्वा उडवला.
तत्पूर्वी, दिंडीगुल ड्रॅगन्सनं फायनल सामन्यात टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात प्रथम फलंदाजी करताना लायका कोवाई किंग्जनं 20 षटकांत 7 बाद 129 धावा केल्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना कर्णधार रविचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) 46 चेंडूत (52) धावा करत फायनल सामन्यात 10 चेंडू शिल्लक असताना ड्रॅगन्सला विजय मिळवून दिला. बाबा इंद्रजीथ 35 चेंडूत (32) धावा आणि शरथ कुमार 15 चेंडूत नाबाद (27) यांनी फलंदाजी करताना संघाला मोलाचं योगदान दिलं.
लायका कोवाई किंग्जकडून गोलंदाजी करताना गौतम तामराय कन्नन, मणिमारन सिद्धार्थ, वालियाप्पन युधिश्वरन आणि कर्णधार शाहरुख खान (Shahrukh Khan) यांनr प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना लायका कोवाई किंग्जसाठी सुरेश कुमारनं 9 चेंडूत (11) धावा केल्या. लायका कोवई किंग्जनं 51 धावांपर्यंत 4 विकेट गमावल्या होत्या, त्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू साई सुदर्शनच्या विकेटचाही समावेश होता. सुदर्शननं 14 चेंडूत फक्त (14) धावा केल्या. राम अरविंदनं सर्वाधिक (27) धावांची खेळी खेळली आणि अतिक उर रहमाननं 25 धावा केल्या, तर कर्णधार शाहरुख खानच्या हाती केवळ निराशाचं लागली.
तामिळनाडू प्रीमीअर लीग (TNPL) 2016 पासून खेळवली जात आहे. यंदाच्या स्पर्थेत तामिळनाडू प्रीमीअर लीगली नवा चॅम्पियन संघ मिळाला ज्याचा कर्णधार रवीचंद्रन अश्विन आहे. फायनल सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार रवीचंद्रन अश्विनला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकावं ते नवलच…! खेळाडूनं हातानं नव्हे चक्क पायानं झेल घेतला; भन्नाट व्हिडिओ व्हायरल
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर होईल का?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ! इमान खलिफनंतर ‘जेंडर’ वादात अडकली आणखी एक महिला बॉक्सर






