सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ५ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. यातील पहिला टी२० सामना ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेठली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यांत भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाचा सलग १३ टी२० सामन्यांत विजय मिळवण्याचा विक्रम बनवण्याचे स्वप्न भंग पावले. या टी२० मालिकेनंतर आता भारताचा संघ आयर्लंड विरुद्ध २ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी बीसीसीआय या तीन खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
१. व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)
व्यंकटेश अय्यर एक उत्क़ष्ट डावखुरा फलंदाज आहे. याआधी झालेल्या भारताच्या टी२० मालिकेत अय्यरने चांगली कामगिरी केली होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२ मध्ये अय्यर विशेष चमक दाखवण्यास अयशस्वी ठरला आहे. त्याने १२ सामन्यांत मात्र १०७च्या स्ट्राईक रेटने १८२ धावा केल्या होत्या. तरीही अय्यरला भारतीय संघात स्थान दिले आहे. त्यामुळे अय्यरला या मालिकेत विशेष कामगिरी करावी लागणार आहे. अन्यथा त्याला आगामी आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत संघाबाहेर रहावे लागेल.
२. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)
भारतीय संघात स्विंग किंग म्हणून प्रचलित असणारा भुवनेश्वर कुमार गेल्या काही कालावधीपासून संघात आत बाहेर करत आहे. कधी तो दुखापतग्रस्त असोत, तर कधी त्याचा फॉर्म त्याच्या जोडीला नसतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत भुवनेश्वर प्रमुख गोलंदाज म्हणून दिसणार आहे. त्यामुळे त्याला या मालिकेत विशेष कामगिरी करावी लागणार आहे. अन्यथा पुढील मालिकेत बुमराह आमि शामीने पुनरागमन केल्यास भुवनेश्वरला संघाबाहेर जावे लागेल.
३. इशान किशन (Ishan Kishan)
डावखुरा सलामीवीर इशान किशनला या मालिकेत सहभागी करून घेतले आहे. इशानचा देखील आयपीएल २००चा हंगाम निराशाजनक होता. त्यानंतर मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यांत त्याने विशेष कामगिरी केली. मात्र, इशानकडून आणखी चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. कारण संघात सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्यासाठी आधीच रोहित शर्मा, केएल राहुल आणि शिखर धवन सारखे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे इशानला या शर्यतीमध्ये टिकून राहायचे असल्यास या मालिकेत चमकदार कामगिरी करणे आवश्यक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
INDvsSA | विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केलं ‘हे’ नकोसं काम, संघाच्या अपेक्षांवर फेरले पाणी
चर्चाच एवढी रंगलीय की, उमरान ‘रॉकेट’ मलिकच्या स्पीडनं लोकं वेडी व्हायची राहिलीत
हार्दिकने ३ वर्षांनंतर भावाच्या अपमानाचा बदला घेतला? कार्तिकने दिलेली कृणालला अपमानास्पद वागणूक