टी २० क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमीच चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. प्रेक्षकांनाही तेच पाहायला आवडते. आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरु होणार आहे. टी२० विश्वचषक म्हटलं की आपल्याला हमखास आठवते ती युवराजने २००७ च्या टी२० विश्वचषकामध्ये इंग्लंडविरुद्ध केलेली दमदार खेळी.
त्याने या डावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडच्या एका षटकातील ६ चेंडूत सलग ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. मागच्या १४ वर्षांपासून युवराजचा ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा विक्रम कोणी मोडू शकले नाही. तसेच त्याचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्यावेळी १२ चेंडूत केलेल्या अर्धशतकाचा विक्रमही अद्याप कोणी मोडलेला नाही. या लेखात आपण असे काही फलंदाज पाहणार आहोत, ज्यांनी युवराज पाठोपाठ टी २० विश्वचषकात सर्वाधिक वेगाने अर्धशतक केले आहे.
स्टीफन मायबर्ग (२०१४)
युवराजनंतर टी२० विश्वचषकामध्ये दुसरे सर्वाधिक वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम नेदरलँडचा स्टीफम मायबर्गच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये बांग्लादेशमध्ये आयर्लंडच्या विरूद्ध खेळताना १७ चेंडूत त्याचे ५० धावा केल्या होत्या. त्याने या डावात ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावा केल्या होत्या.
ग्लेन मॅक्सवेल (२०१४)
टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. मॅक्सवेलने २०१४ मध्ये बांग्लादेशात आयोजित टी२० विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला आहे. त्याने १८ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने ३३ चेंडूत एकूण ७४ धावा केल्या होत्या. सामन्यादरम्याने त्याने ७ चौकार आणि ६ षटकार मारले होते.
मोहम्मद अशरफुल (२००७)
या यादीत चौथे नाव आहे, बांगलादेशचा माजी खेळाडू मोहम्मद अशरफुल याचे. त्याने २००७ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध सामन्यात २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. या सामन्यात त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले होते.
युवराज सिंग (२००७)
या यादीत पाचव्या स्थानावर देखील युवराज सिंगचे नाव आहे. युवराजने वर्ष २००७ मध्ये विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने या सामन्यात ३० चेंडूमध्ये ७० धावा केल्या होत्या. त्याने केलेल्या धावांमध्ये ५ चैकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.
महेला जयवर्धने (२००७)
महिला जयवर्धनेने २००७ मध्ये केनियाविरुद्ध पहिल्या विश्वचषकामध्ये २१ चेंडूत त्याचे अर्धशतक केले होते. त्याने केलेली ही कामगिरी टी२० क्रिकेटमधील सर्वात वेगाने केलेल्या अर्धशतकांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर येते. या सामन्यात जयवर्धनेने २७ चेंडूत ६५ धावा केल्या, यामध्ये ९ चैकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
समालोचनावेळी कैफ असं काही बोलला, ज्यामुळे सेहवाग म्हणाला, “आता तुझ्यामुळे मार खायची वेळ येऊ शकते”
“देवासाठी तरी त्याला सोडा आणि पुढे चला”, रहाणे शुन्यावर बाद झाल्यानंतर पडतोय मीम्सचा पाऊस
रोहित शर्माचे शतक म्हणजे भारताचा विजय पक्का, ही खास आकडेवारी देते पुरावा