---Advertisement---

असे ५ कमनशिबी खेळाडू, जे सीएसकेचा होते भाग; पण एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाले नाही स्थान

On: मंगळवार, एप्रिल 20, 2021 9:51 AM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आयपीएल इतिहासातील, मुंबई इंडियन्स संघानंतर दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघामध्ये खेळण्यासाठी खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतात. एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने २०१० ,२०११ आणि २०१८ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. अनेक दिग्गज खेळाडूंचा वारसा असलेल्या या संघात असेही काही खेळाडू होऊन गेले, ज्यांना संघात जागा तर मिळाली. परंतु प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. चला तर पाहूया कोण आहेत ते ५ कमनशीबी खेळाडू?

१) मॅट हेनरी : न्यूझीलंड संघाचा गोलंदाज मॅट हेनरी याला २०१४ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात स्थान देण्यात आले होते. या संघात स्थान मिळाल्यानंतर असे वाटू लागले होते की, या खेळाडूचे भविष्य उज्वल होणार आहे. कारण अनेक युवा खेळाडूंची कारकीर्द घडविण्यात धोनीचा मोलाचा वाटा राहिला आहे. परंतु असे काहीच घडले नाही. हा युवा गोलंदाज बेंचवरच बसून राहिला. त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालीच नाही.

२) अँड्र्यू टाय : अँड्र्यू टायने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. याच बळावर त्याला २०१५ साली चेन्नई सुपर किंग्ज संघाने खरेदी केले होते. परंतु तो स्पर्धेच्या सुरुवातीलाच दुखापतग्रस्त झाला होता. त्यांनतर संघातील इतर खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टायला संघात खेळण्याची संधी मिळालीच नाही. त्याने चेन्नई संघाकडून एकही सामना खेळला नाही. परंतु २०१८ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने पंजाब संघाकडून खेळताना सिद्ध केले होते की, तो उत्कृष्ट गोलंदाज का आहे? या हंगामात त्याने पर्पल कॅप जिंकली होती.

३) इरफान पठाण : भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करताना अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याला २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु पहिला सामना खेळण्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला होता. त्याने पुनरागमन केले, तेव्हा इतर खेळाडूंनी आपले स्थान निश्चित केले होते. त्यामुळे त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नव्हती.

४) बाबा अपराजित : बाबा अपराजितने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनतर त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. चेन्नई संघात स्थान मिळाल्यानंतर त्याचे भविष्य उज्वल होणार असे वाटू लागले होते. परंतु असे काहीच घडले नाही. कारण चेन्नई संघ संतुलित दिसून येत होता. त्यामुळे या युवा खेळाडूला खेळण्याची संधीच मिळाली नाही.

५) काइल एबोट : २०१५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात खरेदी केल्यावर काइल एबोटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलाच डंका वाजला होता. काइल एबोट डेथ ओवर स्पेशिलिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला होता. परंतु आयपीएलमध्ये एका संघात फक्त ४ परदेशी खेळाडू खेळवण्याचा नियम आहे. त्यामुळे फाफ डू प्लेसी, ब्रावो आणि ड्वेन स्मिथ यांसारखे खेळाडू असताना त्याला संघात स्थान मिळणे कठीण होते. पुढच्या हंगामात त्याला चेन्नई संघांने रिलीज केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठमोळ्या ऋतुराजचा पुन्हा फ्लॉप शो, ‘या’ भारतीय शिलेदाराला संधी देण्याच्या मागणीने धरला जोर

तो ये है राज! सीएसकेसाठी संकटमोचक ठरलेल्या मोईन अलीने ‘यामुळे’ केली उत्कृष्ट गोलंदाजी, स्वतः केला उलगडा

चेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर विजय’; दिल्ली-मुंबईला पछाडत धोनीच्या पलटणचा गुणतालिकेत ‘या’ स्थानावर ताबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---