सध्या अनेक क्रिकेटपटू इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट करताना दिसून आले आहेत. नुकतेच काल(२ एप्रिल) इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही असेच एक चॅट सेशन केले होते.
यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. या गप्पादरम्यान विराटने त्याला कसोटी क्रिकेट आवडते हे सांगितले. तसेच विराट असेही म्हणाला की २०२३ विश्वचषकानंतर तो एखाद्या क्रिकेट प्रकारात खेळणे थांबवण्याचा विचार करेल.
पिटरसनने विराटला त्याच्या आवडत्या क्रिकेट प्रकाराबद्दल विचारले. त्यावर विराटने ‘कसोटी क्रिकेट’ असे ५ वेळा म्हणत उत्तर दिले. तसेच विराट असेही म्हणाला ‘कसोटी क्रिकेट आणि आयुष्याशी जोडलेले आहे. एखाद्या दिवशी तूम्ही धावा करु शकत तेव्हा तूम्ही पुन्हा घरी जाता आणि दुसऱ्या डावाची वाट पहाता.’
‘तूम्हाला आवडत असेल किंवा नसेल तरी तो दिनक्रम सुरुच ठेवावा लागतो. हे आयुष्यासारखंच आहे जिथं तूम्हाला कोणताही पर्याय नसतो, तूम्ही तक्रार करु शतक नाही. कसोटी क्रिकेटने मला एक चांगला व्यक्ती बनवले आहे.’
त्याचबरोबर पिटरसनने विराटला व्यस्त वेळापत्रक असतानाही संतुलन कसे राखतो असे विचारल्यावर विराट म्हणाला, ‘मी विश्रांती घेत असतो. मागील २-३ मोसमांपासून मी सातत्याने हे करत आहे. मला कसोटी क्रिकेटला मुकायचे नाही.’
‘मी ९ वर्षांपासून ३ क्रिकेट प्रकार खेळत आहे. आणि आयपीएलही. तसेच ६ वर्षांपासून नेतृत्व करत आहे. हे सर्व सोपे नाही. पुढील २-३ वर्षे मी असे करत राहिल आणि मग पुढच्या विश्वचषकानंतर कोणते क्रिकेट प्रकार खेळायचे याबद्दलही विचार करेल.’
ट्रेंडिंग घडामोडी –
–५ भारतीय क्रिकेटपटू, ज्यांनी केले आहे महिला खेळाडूंशी लग्न
३ असे क्रिकेटर, ज्यांनी केले आहे आपल्या फॅन्सशी लग्न
२ असे व्यक्ती, ज्यांनी खेळाडू व प्रशिक्षक म्हणून जिंकला आहे क्रिकेट विश्वचषक