बेंगलोर | एप्रिल 2019 मध्ये भारतीय जेष्ठ महिला हॉकी संघात ज्योती या नवोदित हॉकीपटूने पदार्पण केले. यादरम्यान भारतीय हॉकी संघ मलेशिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर भारतीय हॉकी संघाने चार सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णित होता.
वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी संघात पदार्पण करणाऱ्या ज्योतीला विश्वास आहे की वरिष्ठ खेळाडूंकडून तिला खेळाचे गुण शिकायला मिळेल.
पदार्पणाबद्दल बोलताना ज्योती म्हणाली की, “भारतीय वरिष्ठ महिला हॉकी संघात स्थान मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. मला वाटते की संघात असलेल्या अनुभवी खेळाडूंमुळे मला खूप फायदा झाला.या खेळाडूंकडून मी नेहमीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते ते मैदानात असो अथवा मैदानाबाहेर. हॉकी इंडियाचे आम्हाला उत्तम सहकार्य लाभले. मुख्य प्रशिक्षक सोजर्ड मारिजणे यांनीही मोलाचं मार्गदर्शन केलं. यामुळे या संघासोबत वेळ घालवन्याचा अनुभव चांगला होता.”
“संघात बर्याच जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा भरणा आहे. या संघात वंदना, राणी, नवजोत, नवनीत या विश्वासू खेळाडूंचा मजबूत गट आहे. त्यामुळे माझी क्षमता आणि माझ्या खेळाच्या सर्व बाबींमध्ये सुधार करण्यास मला मदत होईल. जेव्हा मी मैदानावर पाऊल टाकते, तेव्हा मला जाणवते मी उत्कृष्ट दर्जाच्या खेळाडूंसह खेळत आहे. त्यामुळे सामना जिंकण्याचा आत्मविश्वास वाढतो,” असंही पुढे बोलताना ज्योती म्हणाली.
महत्त्वाच्या बातम्या –
आजारी असलेल्या ‘या’ दिग्गज हॉकीपटूला सुनील गावसकर यांचा मदतीचा हात
खेळाडू क्रिकेटचे सामने खेळून घालवतात वेळ, भारतीय हॉकीपटूने एसएआयमध्ये राहण्याचा सांगितला अनुभव
कोरोनामुळे घरी न परतण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय हॉकीपटूने हॉस्टेलमध्ये ‘असा’ घालवला वेळ