दिल्ली । आशिष नेहरा जेव्हा आपला पहिला सामना २४ फेब्रुवारी १९९९ रोजी कोलंबो येथे श्रीलंका संघाविरुद्ध खेळला होता तेव्हा संघात असणाऱ्या खेळाडूंपैकी केवळ हरभजन सिंग या खेळाडूने आज निवृत्ती घेतली नाही.
त्यावेळी संघाचा करणार मोहम्मद अझरुद्दीन होता तर यष्टीरक्षक नयन मोंगिया होता. ह्या सामना ड्रॉ राहिला होता.
या सामन्यात पहिल्या डावात राहुल द्रविड आणि सदगोपान रमेश यांनी शतकी खेळी तर दुसऱ्या डावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतकी खेळी केली होती.
यातील राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे या खेळाडूंनी पुढे भारतीय संघाचे कसोटीत नेतृत्व केले.
त्या सामन्यात खेळलेले खेळाडू: सदगोपान रमेश, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, नयन मोंगिया, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, वेंकटेश प्रसाद, आशिष नेहरा.