भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज फिरकी गोलंदाजांचा वारसा लाभला आहे, ज्यांनी आपल्या कामगिरीने भारतीय संघाला अनेक मोठमोठ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहेत. यामध्ये अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे. तसेच मॉडर्न डे क्रिकेटमध्ये देखील अनेक असे फिरकी गोलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीने भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्यापैकीच एक म्हणजे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची जोडी.
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या जोडीला ‘कुल-चा’ असेही म्हटले जाते. या दोघांनी अनेकदा भारतीय संघाला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे. या दोघांना २०१९ विश्वचषक स्पर्धेत देखील संधी देण्यात आली होती. या स्पर्धेत दोघांनीही उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.
गेल्या काही महिन्यांपासून या दोघांनाही एकत्र खेळण्याची संधी मिळाली नाही, ज्याचा परिणाम दोघांच्याही कामगिरीवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा दबावात यांना चांगली कामगिरी करता आली नाही. आगामी श्रीलंका दौऱ्यावर या दोन्ही गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. हा दौरा त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी शेवटचा दौरा ठरू शकतो. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूने मागणी केली आहे की, दोघांनाही एकत्र संधी दिली गेली पाहिजे. (Please allow them to play together,Aakash chopra requests to Indian team)
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोपडा याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे की, “मला नाही वाटत यापेक्षा आणखी चांगली संधी यापुढे मिळेल. भारतीय संघात ‘कुल-चा’ जोडीला यामुळे संधी देण्यात आली होती की, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे मध्यक्रमातील फलंदाजांना बाद करण्यात अपयशी ठरत होते. संघाला सुरुवातीच्या १० षटकात गडी बाद करण्यात अपयश आले तर, मध्यक्रामातील फलंदाजांना बाद करणेही कठीण जाईल. ज्यामुळे शेवटच्या षटकात जास्त धावा कुटल्या जातात. त्यामुळे या दोघांना मध्यक्रमातील फलंदाज फलंदाजी करत असताना गोलंदाजी दिली जायची आणि या गोलंदाजांनी मिळून ६ च्या इकॉनॉमीने ३४ सामन्यात ११८ गडी बाद केले होते.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “विश्वचषक २०१९ स्पर्धेत इंग्लंड संघाविरुद्ध या दोघांनी निराशाजनक कामगिरी केली होती. ज्यामुळे हे दोघेही पुन्हा एकत्र मैदानावर दिसून आले नाहीत. परंतु श्रीलंका दौऱ्यावर हार्दिक पंड्या देखील गोलंदाजी करणार आहे. आर अश्विन आणि जडेजा मात्र श्रीलंकेविरुद्ध नसतील. त्यामुळे भारतीय संघाला विनंती आहे की, या कुलदीप आणि चहल यांना एकत्र खेळवावे.”
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना आज (१८ जुलै) खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भलाईचा जमानाच नाही! खिलाडूवृत्ती दाखवत रूटने ज्याला जिवनदान दिले, त्यानेच संघाला दिला चोप
भलाईचा जमानाच नाही! खिलाडूवृत्ती दाखवत रूटने ज्याला जिवनदान दिले, त्यानेच संघाला दिला चोप
आज हिरो असलेल्या ईशानला काही वर्षांपूर्वी लोकांनी केली होती मारहाण, दिली गेलेली पोलीस तक्रार