भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडला. या कसोटीत भारताने दमदार विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. उमेश यादवचे वडील तिलक यादव यांचे निधन झाले होते. उमेशच्या वडिलांनी नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्यामुळे तो नागपूरला परतला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीपूर्वी तो पुन्हा संघात सामील झाला. अशात आता उमेश यादवच्या वडिलांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्याला एक पत्र लिहिले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याला नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वडिलांच्या निधनासंबंधी पत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिले की, “तुमचे वडील श्री तिलक यादव यांच्या निधनाबाबत कळताच अत्यंत दु:ख झाले. वडिलांची छत्रछाया आणि त्यांचा स्नेह आयुष्याचा भक्कम आधार असतो. श्री तिलक यादव यांनी कुटुंबातील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.”
त्यांनी पुढे लिहिले की, “क्रिकेट जगतात तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासामागे त्यांच्या त्याग आणि समर्पणाची मोठी भूमिका राहिली आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही निर्णय घेतले, त्यावर त्यांनी पूर्ण विश्वास दाखवत नेहमी तुमची साथ दिली.” याव्यतिरिक्त मोदींनी पत्रात उमेश यादवच्या वडिलांच्या निधनामुळे होत असलेल्या दु:खाबाबतही भाष्य केले.
सोशल मीडियावर मोदींना दिला धन्यवाद
भारताच्या 35 वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने नरेंद्र मोदींनी पाठवलेले हे पत्र सोशल मीडियावर शेअर करत त्यांना धन्यवाद दिला. त्याने सोशल मीडियावर मोदींचे पत्र शेअर करत लिहिले की, “माझ्या वडिलांच्या निधनावर तुम्ही शोक संदेश दिल्याबद्दल धन्यवाद माननीय पंतप्रधान जी. हे माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहे.”
Thank you, Honourable Prime Minister @narendramodi ji, for your condolence message on the sad demise of my father🙏. This gesture means a lot to me and my family. pic.twitter.com/u68cE4e6Jn
— Umesh Yaadav (@y_umesh) March 3, 2023
याव्यतिरिक्त उमेश यादव याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने इंदोर कसोटी सामन्यात शानदार प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात 12 धावा देत 3 विकेट्स नावावर केल्या होत्या. मात्र, तिसऱ्या कसोटीत भारताला 9 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अशात 9 मार्चपासून उभय संघात मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे होणार आहे. (pm narendra modi condolence letter to fast bowler umesh yadav on father death read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूपीएल पहिली लढत मुंबई आणि गुजरात संघात, जाणून घ्या केव्हा आणि कधी पाहता येणार सामना
गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळी चंदनाचा लेप; विराटने सपत्नीक घेतले महाकालचे दर्शन; पाहा व्हिडिओ