टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमविरुद्ध उपांत्य फेरीत २-५ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. यासोबतच, ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकचा अंतिम सामना खेळण्याचे भारताचे स्वप्न संपुष्टात आले आहे. भारताचा हा पराभव झाल्यानंतर अनेक क्रीडाप्रेमींनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
उपांत्य सामन्यात भारताचा पराभव
जवळपास चार दशकानंतर ऑलिम्पिकमधील अंतिम सामना खेळण्याची भारतीय पुरुष हॉकी संघाकडे संधी होती. मात्र, विश्वविजेत्या व रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या बेल्जियमकडून संघाला ५-२ असा पराभव पत्करावा लागला. भारताकडून हरमनप्रीत सिंग व मंदीप सिंग यांनी गोल झळकावले. विजेत्या बेल्जियमसाठी स्टार ड्रॅगफ्लिकर अलेक्झांडर हेंड्रिक्सने हॅट्रिक पूर्ण केली. आता भारत कांस्य पदकासाठी जर्मनीशी दोन हात करेल.
भारतीय पंतप्रधान होतायेत ट्रोल
भारतीय संघाच्या या पराभवानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच ट्रोल होत आहेत. अनेक नेटकर्यांनी भारताच्या पराभवासाठी त्यांना जबाबदार धरले. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी ७.३५ वाजता आपण हा उपांत्य फेरीचा सामना पाहत असल्याचे ट्विट केले. तोपर्यंत भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर अचानकपणे भारतीय संघाची कामगिरी घसरली व संघाला ५-२ ने पराभव पाहावा लागला. याचे खापर चाहत्यांनी मोदींवर फोडत ट्विट करत त्यांना कांस्य पदकासाठीचा सामना न पाहण्याची विनंती केली.
I’m watching the India vs Belgium Hockey Men’s Semi Final at #Tokyo2020. Proud of our team and their skills. Wishing them the very best!
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2021
एका चाहत्याने मीमद्वारे मोदींनी ट्विट करण्याआधीची परिस्थिती व नंतरची परिस्थिती दर्शवली. एका ट्विटर वापरकर्त्याने मीमद्वारे चाहते महिला संघाच्या उपांत्य सामन्यापूर्वी पंतप्रधान निवासाची वीज जोडणी तोडत असल्याचे दाखवले आहे. याव्यतिरिक्तही चाहत्यांनी अनेक मजेदार प्रतिक्रिया दिलेल्या दिसून येत आहेत. भारतीय महिला संघाचा उपांत्य सामना देखील न पाहण्याची विनंती चाहत्यांनी मोदी यांना केली आहे.
Bhagwaan ke liye #Bronze medal match mat dekhna 🙏🙏🙏 https://t.co/hSjdEmGiLC
— Rav!ndra !namdar (@iRavi_Inamdar) August 3, 2021
महिला हॉकी टीम के सेमीफाइनल से पहले प्रधानमंत्री आवास की केबल काटने पहुंचा खेलप्रेमी। #Tokyo2020 #Hockey pic.twitter.com/n6UHhDCplK
— Rofl Gandhi 2.0 🏹 (@RoflGandhi_) August 3, 2021
#मुमकिन_है 🙏 https://t.co/TZkl6FYeIf pic.twitter.com/1UjxvmtoSE
— SANDESH BHAGWAT (@S4NDY07) August 3, 2021
आता भारताचा कांस्य पदकासाठी जर्मनीशी ५ ऑगस्ट रोजी सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-० किंवा ३-१ अशी बाजी मारणार”, दिग्गज भारतीय खेळाडूचे भाकीत
अगरवालही दुखापतग्रस्त, आता रोहितबरोबर सलामीला फलंदाजी करणार कोण? गावसकरांनी घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव