---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर टिनू योहान्नन

---Advertisement---

संपुर्ण नाव- टिनू योहान्नन

जन्मतारिख- 18 फेब्रुवारी, 1979

जन्मस्थळ- क्विलॉन (आताचे कोलम), केरळ

मुख्य संघ- भारत, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि केरळ

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 3 ते 6 डिसेंबर, 2001

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 29 मे, 2002

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 3, धावा- 13, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 2/56

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 3, धावा- 7, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 3/33

थोडक्यात माहिती-

-भारतीय अ‍ॅथलीट थडथुविला चंदापिल्लई योहान्नन ज्यांना टी. सी. योहान्नन म्हणून ओळखले जाते, यांचे सुपुत्र म्हणजे तिनू योहान्नन.

-वडील टी. सी. योहान्नन यांनी 1974ला तेहेरन आशियाई स्पर्धेत नवीन लांबउडी विक्रम नोंदवला होता. त्यांचा हा विक्रम पुढे 3 दशक कायम होता. तसेच त्यांनी टोकियो, हिराशिमा आणि कोब येथे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिकंली आहेत.

-टिनू योहान्नन हे केरळमधील पहिले क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी भारताकडून क्रिकेट खेळले आहे.

-भारतीय संघात आजवर असे अनेक वेगवान गोलंदाज होऊन गेले. ज्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात दमदार केली पण त्यांना शेवटी चांगली कामगिरी करता आली नाही. यापैकी एक तिनूदेखील आहेत.

-टिनू यांनी त्यांच्या कसोटी पदार्पणाच्या पहिल्या षटकातच विकेट घेतली होती. पण पुढे त्यांची गोलंदाजी चमकू शकली नसल्याने त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द खूप कमी काळाची ठरली.

-2001ला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिनू यांनी पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरच विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांनी पहिल्या कसोटी सामन्यातच इंग्लंडच्या 2 फलंदाजांना बाद केले होते.

-टिनूंच्या कसोटीची सुरुवात चांगली झाली. पण त्यांना प्रत्येकी 3 कसोटी आणि वनडे सामन्यांवर समाधान मानावे लागले. यावेळी त्यांनी कसोटी आणि वनडेत प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या.

-2002-03साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तिनू यांनी रणजी ट्रॉफीतील खेळी चालू ठेवली. यावेळी 2009-10पर्यंत केरळकडून पुनरागमन करत त्यांनी 24 विकेट्स घेतल्या.

-दरम्यान 2000साली त्यांची आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स संघाकडून निवड झाली होती. पण इथेही ते जास्त काळ टिकू शकल् नाहीत.

-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ते केरळ रणजी ट्रॉफी संघाचे प्रशिक्षक बनले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---