१९ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात आत्तापर्यंत ११ सामने खेळले गेले. ११ सामने रोमांचक ठरले. अनेकदा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. विशेष म्हणजे २ सामने सुपर ओव्हरमध्येही गेले. मंगळवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीला १६३ धावांचे आव्हान दिले होते. ह्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १४७ धावाच करु शकला. त्यामुळे हैदराबादने या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवला.
या विजयाबरोबरच त्यांनी यंदाच्या आयपीएल हंगामात विजयाचे खाते उघडत २ गुणांची कमाई केली. याबरोबच गुणतालिकेत शेवटच्या स्थानावरुन ६ व्या क्रमांकावर उडी घेतली. यावेळी त्यांनी गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला आणि कोलकाता नाईट रायडर्सला मागे टाकले. चेन्नई ८ व्या क्रमांकावर आहे, तर कोलकाता ७ व्या क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर या हंगामातील हा दिल्लीचा पहिला पराभव होता. त्यांनी या हंगामातील त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले होते. या पराभवामुळे दिल्लीला गुणतालिकेतील त्यांचे अव्वल स्थान गमवावे लागले आहे. ते आता दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. तर अव्वल क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहेत.
११ सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल –
१- राजस्थान रॉयल्स : (सामना २, विजय २, पराभव 0, गुण ४, नेट रन रेट +०.६१५)
२-दिल्ली कॅपिटल्स : (सामना ३, विजय २, पराभव १, गुण ४, नेट रन रेट +०.४८३)
३- रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू : (सामना ३, विजय २, पराभव १, गुण-४, नेट रन रेट -१.४५०)
४. किंग्स XI पंजाब : (सामना ३, विजय १, पराभव २, गुण २, नेट रन रेट +१.४९८)
५- मुंबई इंडियन्स: (सामना ३, विजय १, पराभव २, गुण २, नेट रन रेट +०.६५४)
६. सनरायझर्स हैदराबाद : (सामने ३, विजय १, पराभव २, गुण २, नेट रन रेट -०.२२८)
७. कोलकाता नाइट रायडर्स : (सामने-२, विजय-१, पराभव-१, गुण-२, नेट रन रेट -०.७६७)
८- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने ३, विजय १, पराभव २, गुण २, नेट रन रेट -०.८४०)