इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम यंदा युएईमध्ये खेळला जात आहे. ही जगातील सर्वात लोकप्रिय टी 20 लीग आहे. या स्पर्धेच्या लोकप्रियतेमुळे बुकीही दरवर्षी यावर लक्ष ठेवतात. सट्टा रोखण्यासाठी पोलिसही स्पर्धेदरम्यान खूप सतर्क असतात. आयपीएल 2020 दरम्यान सट्टेबाजी रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
मध्यप्रदेशातील शडहोल शहरातील पोलिसांनी आयपीएलध्ये सुरु असलेला 2.88 कोटींचा सट्टा पकडला आहे. 11 बुकींना अटक करण्यात आली असून 25 लाख रुपये जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय सट्टेबाज राजा संतराम जयस्वाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे हवाला कनेक्शन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहारही उघड झाले आहेत. पोलिसांनी अनेक मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, जप्त केले आहेत.
व्यावसायिकांच नाव आलं समोर
एसपी सतेंद्र शुक्ला म्हणाले की, सट्टेबाजांकडून कोट्यावधींच्या व्यवहारांची माहिती मिळाली आहे. यात आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकांचा समावेश आहे. यात अनेक व्यावसायिकांची नावे देखील आहेत.
हवाला रॅकेटशी संबंध:
हवाला रॅकेटशी सट्टा किंग संतराम संपर्कात होता.एसपी म्हणाले की,“संतराम परदेशातील सट्टेबाज व्यावसायिकाशी संपर्क साधत होता. त्याच्याकडून यूजर-आयडी घेऊन व्यवसाय चालवत असे. तो पोर्टल आणि मोबाईल अॅप्सचा सहारा घेत असे.”