ऑस्ट्रेलियामध्ये सध्या अनेक क्रिकेट सामने सुरु आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबरोबरच तिथे बिग बॅश लीग(बीबीएल) ही टी२० स्पर्धाही सुरु आहे. टी२० स्पर्धा म्हटलं की सट्टेबाज सतर्क होतात. असाच एक प्रकार महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात झाला आहे. तिथे ऑस्ट्रेलियातील बीबीएल स्पर्धेतील सामन्यांवर सट्टा लावला जात होता.
दरम्यान यवळतमाळमध्ये सुरु असलेल्या सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ४ जणांना ताब्यात घेतले आहे. या ४ जणांकडून रोख ३ लाख १८ हजार रुपये तसेच साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
बीबीएल स्पर्धेदरम्यान यवतमाळ शहरामध्ये ऑनलाईन सट्टा अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून या अड्ड्यावर महिला अत्याचार कक्ष आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसह धाड टाकली. त्यावेळी सामन्यावर सट्टा लावणे सुरु होते. घटनास्थळी पोलिसांना ४ जण सापडले. यावेळी पोलिसांनी ३ लाख १८ हजार रुपयांसह साडेतीन लाखांचे अन्य साहित्यासह सर्व मुद्देमाल जप्त केला.
बीसीसीएलचा २०२०-२१ चा हंगाम १० डिसेंबरपासून सुरु झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते
साल २०२० केएल राहुलसाठी ठरले खास, विराट, रोहितलाही टाकले मागे
“भारताचा मेलबर्न कसोटीतील विजय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम पुनरागमनांपैकी एक”