क्रीडाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पोर्तुगाल देशाचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोनाल्डो हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. त्याने या विक्रमात कुवैतच्या बादेर अल-मुतावा याला पछाडले आहे. बादेर याने त्याच्या फुटबॉल कारकीर्दीत एकूण 196 सामने खेळले आहेत. आता त्याच्यानंतर रोनाल्डोने हा मान मिळवला आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हा गुरुवारी (दि. 23 मार्च) लिचटेन्सटाईनविरुद्ध मैदानात उतरला होता. हा त्याच्या फुटबॉल कारकीर्दीतील 197वा सामना होता. यूरो कप 2024च्या या क्वालिफायर सामन्यात रोनाल्डोने दमदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात दोन गोल केले. पोर्तुगालने लिचटेन्सटाईनला 4-0ने पराभूत करत हा सामना आपल्या नावावर केला.
Senhoras e senhores, o 👑 dos Recordes: @Cristiano Ronaldo é o Mais Internacional de SEMPRE! 🐐 🇵🇹 #VesteABandeira
Ladies and gentlemen, the 👑 of Records: Cristiano Ronaldo is the player with the Most International Caps in History! 🐐 🇵🇹 #WearTheFlag pic.twitter.com/IAblk5dVqb
— Portugal (@selecaoportugal) March 23, 2023
रोनाल्डोचे दोन गोल
या सामन्यात पोर्तुगाल संघाचे एकतर्फी वर्चस्व राहिले. पोर्तुगालने 8व्या मिनिटाला जो कांसेलो याच्या गोलच्या मदतीने आघाडी घेतली होती. 47व्या मिनिटाला बर्नार्डो सिल्व्हा याने ही आघाडी आणखी वाढवली. त्यानंतर रोनाल्डोने धमाल केली. त्याने सर्वप्रथम 51व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटमधून गोल केला. त्यानंतर त्याने 63व्या मिनिटाला एक लाजवाब फ्री किकवर गोल मारला.
रोनाल्डोचा असाही विक्रम
या सामन्यात गोल करत 38वर्षीय रोनाल्डो याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. तो 100 सामन्यात गोल करणारा पहिला फुटबॉलपटू बनला. खरं तर, रोनाल्डो हा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे. या दोन गोलच्या जोरावर त्याने आपला विक्रम आणखी मजबूत केला आहे. रोनाल्डोने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आतापर्यंत 120 गोल केले आहेत.
संपूर्ण कारकीर्दीत 800हून अधिक गोल
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा असा एकमेवर फुटबॉलपटू होता, ज्याने आपल्या कारकीर्दीत 800 गोल मारले होते. नुकतेच लिओनल मेस्सी (Lionel Messi) हा 800 गोल करणारा दुसरा फुटबॉलपटू बनला. रोनाल्डोचे सध्या एकूण 830 गोल्स आहेत. तसेच, रोनाल्डो हा 5 वेगवेगळ्या विश्वचषकात गोल करणारा एकमेव फुटबॉलपटूही आहे. (Portugal star cristiano ronaldo most international capped player in football history)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एटीके मोहन बागानने उंचावली ISL ट्रॉफी! बेंगलोर एफसी पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत
ब्रिक स्कूल संघाची विजयी सलामी । आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्स स्पर्धा