Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रिक स्कूल संघाची विजयी सलामी । आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्स स्पर्धा

ब्रिक स्कूल संघाची विजयी सलामी । आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्स स्पर्धा

March 16, 2023
in टॉप बातम्या, फुटबॉल
File Photo

File Photo


पुणे : ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्टर संघाने विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्स स्पर्धेतील फुटबॉलमध्ये विजयी सलामी दिली. सलामीच्या लढतीत ब्रिक स्कूलने सिम्बायोसिस स्कूल ऑफ आर्किटेक्चरचा पराभव केला.

वानवडी येथील एस.आर.पी. एफ.च्या मैदानावर फुटबॉलचे सामने झाले. स्पर्धेचे उद्घाटन भारतीय महिला बास्केटबॉल संघाची कर्णधार शिरिन लिमये, राष्ट्रीय ॲथलिट प्रियांका चवरकर, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे संचालक प्रसन्न देसाई, सचिव जितेंद्र पितलिया यांच्या हस्ते झाले.

यानंतर पहिल्या लढतीत ब्रिक स्कूलने सिम्बायोसिसवर २-०ने मात केली. ब्रिक स्कूलने सुरुवातीलाच चेंडूवर वर्चस्व मिळवले. याचा फायदा घेऊन लढतीच्या तिसऱ्याच मिनिटाला शिवमने केलेल्या गोलमुळे ब्रिक स्कूलने आघाडी घेतली. हा गोल ब्रिक स्कूलचा आत्मविश्वास वाढणारा ठरला. यानंतर त्यांनी आक्रमक चाली रचल्या. लढतीच्या १९व्या मिनिटाला अंशने गोल करून ब्रिकला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून ब्रिकने विजय मिळवला.

यानंतर अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि एम.सी. इ. सोसायटीचे अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. दोन्ही संघांना गोल करण्याच्या चांगल्या संधी मिळाल्या. मात्र, या संधींचे सोने करता आले नाही. मध्यंतराला असलेली गोलशून्यची कोंडी निर्धारित वेळेपर्यंत कायम राहिली.

यानंतर मुलींच्या गटातील फुटबॉल स्पर्धेत एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात समिक्षा पाटीलने १४व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. नवले कॉलेजच्या मुलींनी बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. मुलींच्या गटातील दुसऱ्या लढतीत अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर १-०ने मात केली. या लढतीच्या आठव्या मिनिटाला कर्णधार प्रीतीने केलेला गोल निर्णायक ठरला.
(Victory Salute of Brick School Team. Architecture Intercollegiate Sports League, Shearforce Competition)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विन-जडेजा की अक्षर? WTC फायनलमध्ये कोणाला मिळणार जागा? वरिष्ठ खेळाडूने दिले उत्तर
शोएब अख्तरचे ‘हे’ विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज


Next Post
Hardik-Pandya

सॉरी, नो टेस्ट क्रिकेट! कसोटी संघातील पुनरागमनाला हार्दिकचा स्पष्ट नकार

KL-Rahul

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका राहुलसाठी ठरणार 'डू ऑर डाय'! तीन सामन्यांवर कारकीर्द अवलंबून

ms-dhoni-harbhajan-singh

"सीएसकेसह घालवलेली 2 वर्षे कारकिर्दीतील सर्वोत्तम", भज्जीने दिली खुल्या दिलाने कबुली

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143