Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारती, सिंहगड, श्री शिवाजी मराठा कॉलेज उपांत्यपूर्व फेरीत

भारती, सिंहगड, श्री शिवाजी मराठा कॉलेज उपांत्यपूर्व फेरीत

March 16, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
File Photo

File Photo


पुणे: भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एसएसएमएस सीओए), सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून आंतरमहाविद्यालयीन श्री शिवाजी मराठा आर्किटेक्चर अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या आर्किटेक्चर महाविद्यलयाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा अरण्येश्वर कॅम्पसमधील क्रिकेट मैदानावर होत आहेत. भारती विद्यापीठ संघाने एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर सहा गडी राखून मात केली. एमआयटीने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ६४ धावा केल्या. भारतीय विद्यापीठाने विजयी लक्ष्य ५.१ षटकांत चार गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात वरद हांडेने २३ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह नाबाद ४४ धावा करून भारती विद्यापीठाला विजय मिळवून दिला. सलग दोन विजय मिळवून भारती विद्यापीठाने बाद फेरीत प्रवेश केला.

यानंतर शिवाजी मराठा आर्किटेक्चर संघाने विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ आर्किटेक्चरवर नऊ गडी राखून विजय मिळवला. विद्या प्रतिष्ठानने दिलेले ५२ धावांचे लक्ष्य शिवाजी मराठा आर्किटेक्चर संघाने ५.५ षटकांत एका गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. शिवाजी मराठा आर्किटेक्चर संघाकडून अवधूत गोगावलने चार गडी बाद केले, राज सासवडेने नाबाद २९ धावा करून विजयात मोलाचा वाटा उचलला.सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ३४ धावांनी मात केली. सलग तिसरा विजय मिळवून सिंहगड कॉलेज गटात अव्वल क्रमांकावर राहून उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले.

संक्षिप्त धावफलक – एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ५ बाद ६४ (चिन्मय रासकर नाबाद १६, यश हरपाळे १०, अथर्व कदम २-२३, आयुष बंग २-१९) पराभूत वि. भारतीय विद्यापीठ – ५.१ षटकांत ४ बाद ६६ (वरद हंडे नाबाद ४४, अर्पित अगरवाल नाबाद १०, कैवल्य सुपेकर १-१५). सामनावीर-वरद हंडे

विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ७ बाद ५१ (प्रसाद पागळे नाबाद १५, अवधूत गोगावले ४-१४, विपूर गुजर १-५, राज कासार १-२३) पराभूत वि. शिवाजी मराठा आर्किटेक्चर – ५.५ षटकांत १ बाद ५४ (राज सासवडे नाबाद २९, वैभव लोहार १६). सामनावीर-राज सासवडे

सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत २ बाद ६७ (सोहम येडेकर नाबाद २२, मयूर रेणके १८, केशव सुतार नाबाद ११, प्रज्वल विरकर १-१९, मयूर चौधरी १-१५) वि. वि. ट्रनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत ९ बाद ३३ (कैवल्य पठाडे १४, मयूर रेणके ४-५, केशव सुतार ३-४, साहिल १-४). सामनावीर-मयूर रेणके

पीडीईए सीओए – ६ षटकांत ४ बाद ८१ (हर्षवर्धन माने ३१, युवराज मालविया १९, गौरव पासंगे १८, ऋषी गुंजाळ १-५, गौरव रत्नपारखी १-१६, धीरज पटेल १-३०) वि. वि. इंदिरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ६ षटकांत २ बाद ५९ (धीरज पटेल नाबाद ३०, तेजस शेलार १५, गौरव पासंगे १-१५, शांतनू सावंत १-१५). सामनावीर-हर्षवर्धन माने


Next Post
File Photo

ब्रिक स्कूल संघाची विजयी सलामी । आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्स स्पर्धा

Hardik-Pandya

सॉरी, नो टेस्ट क्रिकेट! कसोटी संघातील पुनरागमनाला हार्दिकचा स्पष्ट नकार

KL-Rahul

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका राहुलसाठी ठरणार 'डू ऑर डाय'! तीन सामन्यांवर कारकीर्द अवलंबून

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143