---Advertisement---

पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पुन्हा पॉझिटिव्ह; मोहम्मद हफीझच्या कोरोना टेस्टने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हादरले

On: शनिवार, जून 27, 2020 6:00 PM
---Advertisement---

मुंबई । मोहम्मद हाफीजचा कोरोना अहवाल पहिला पॉझिटिव्ह, त्यानंतर निगेटिव्ह आणि पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगलेच हादरले आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पीसीबीने शौकत खानम हॉस्पिटलमध्ये सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली होती. त्यात मोहम्मद हाफीजचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच सपोर्ट स्टाफ आणि १० अन्य खेळाडूंचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर हाफिजने वैयक्तिकरित्या एका हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणी केली. त्यात त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.

पीसीबीने मोहम्मद हाफीजला क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले होते. पण मोहम्मद हाफिजने याला नकार दिला. त्यामुळे पीसीबी त्याच्या या वर्तणुकीकर राग व्यक्त करत नियमांचे पालन न केल्याने त्याच्यावर कारवाई करणार आहे.

शौकत खानम हॉस्पिटलमध्ये मोहम्मद हाफीजच्या पहिल्या स्वॅबची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पीसीबी शनिवारच्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूंची नावे घोषित करणार आहे. यात क्वारंटाइनच्या नियमाचे पालन केले नाही त्यांच्यावर पीसीबी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

ज्या खेळाडूंचा दुसऱ्यांदा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह त्या खेळाडूंना संघासह इंग्लंडला जाता येणार नाही. इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांना क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद हाफीजचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो फारच चिंतेत होता. यासोबतच त्याचे संपूर्ण कुटुंब देखील चिंतेत पडले होते.

ट्रेंडिंग घडामोडी –

मित्रामुळे दिल्ली डेअरडेविल्समध्ये विराटला मिळाली नाही २००८ ला संधी, पहा कुणी केलाय खुलासा

केवळ १६ व्या वर्षी सचिनला गोलंदाजी करताना घाबरला नव्हता हा गोलंदाज, हे होते कारण

श्रीसंत म्हणतो, ही ट्रॉफी जिंकली की मी धोनीला खांद्यावर घेऊन मारणार मैदानाला फेरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---