आयपीएल २०२० चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. साखळी फेरीतील सर्व संघांचे शेवटचे सामने बाकी आहेत. पण असे असतानाही अजूनही प्लेऑफमधील ४ संघ निश्चित झालेले नाही. केवळ मुंबई इंडियन्सने प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. उर्वरित ३ जागांसाठी ६ संघ शर्यतीत आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थीतीत भारताचा माजी गोलंदाज प्रज्ञान ओझाने प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतील अशा ४ संघांची निवड केली आहे.
स्पोर्ट्स टूडेशी बोलताना प्रज्ञान म्हणाला, ‘मी आधीही हे म्हटले आहे की हा आयपीएल हंगाम खूप वेगळा आहे. मी माझ्या क्रिकेटच्या डोक्याने जाणार नाही (प्लेऑफमधील संघ निवडण्याबाबतीत). मी प्लेऑफचे ४ संघ माझ्या भावनांच्या आधारे निवडेल. माझी इच्छा आहे की आपल्या भारतीय कर्णधारांनी चांगली कामगिरी करावी.’
तो पुढे म्हणाला, ‘या नुसार पाहायला गेले तर मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. आत्ता कायरन पोलार्ड संघाचे प्रभारी नेतृत्व करत आहे. पण नियमित कर्णधार रोहित शर्मा आहे. यानंतर श्रेयस अय्यर नेतृत्व करत असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ, विराट कोहली कर्णधार असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आणि केएल राहुल कर्णधार असलेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ, हे ४ संघ प्लेऑमध्ये असायला हवे.’
अशी आहे गुणतालिका-
सध्या मुंबई १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. तर बेंगलोर आणि दिल्ली प्रत्येकी १४ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या दोन संघात त्यांचा शेवटचा साखळी सामना होणार आहे. त्यामुळे हा सामना जो जिंकेल तो प्लेऑफसाठी निश्चितपणे पात्र ठरणार आहे.
#SRH get to No.4 in the Points Table after Match 52 of #Dream11IPL pic.twitter.com/y4ElJcd4w4
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020
तसेच सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चारही संघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. त्यामुळे या चारही संघांसाठी त्यांचे शेवटचे साखळी फेरीतील सामने महत्त्वाचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“तीन पराभवानंतर सलग 3 सामने जिंकूही शकतो”, बेंगलोरच्या दिग्गजाला आहे विश्वास
सुवर्णसंधी! गावसकर- शास्त्रींच्या क्रिकेटमधील मौल्यवान वस्तू विकत घेण्याची चाहत्यांना संधी
हा तूझा शेवटचा सामना आहे का? प्रश्नावर धोनीने दिले ‘हे’ उत्तर
ट्रेंडिंग लेख –
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…