---Advertisement---

प्रसिद्ध कृष्णाचा घातक बाऊन्सर जोराने लागला फलंदाजाच्या मानेवर अन्… बघा थरारक Video

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 4:27 PM
---Advertisement---

रविवारी (११ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामातील अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने १० धावांनी विजय मिळवला. सोशल मीडियावर या विजयासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. कोलकाताचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या एका चेंडूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सलामी फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. हैदराबाद संघाकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ५५ आणि मनीष पांडेने ६१ धावांची खेळी केली होती.

या सामन्यातील १६ व्या षटकात जे काही घडले त्याने सर्वांच्याच हृदयाची धडधड वाढली होती. १६ वे षटक फेकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा आला होता. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या मोहम्मद नबीने चौकार लगावला होता. त्यांनतर पुढील चेंडूवर पुनरागमन करत प्रसिद्ध कृष्णाने त्याला वेगवान बाउन्सर चेंडूचा मारा केला.

हा चेंडू जाऊन त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला लागला होता. ज्यामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर हरभजन सिंगने जाऊन त्याची विचारपुस केली होती. नंतर फिजिओ देखील मैदानावर आले होते.

https://twitter.com/im_maqbool/status/1381327126918426625?s=20

याच षटकात प्रसिद्ध कृष्णाने त्याला शेवटच्या चेंडूवर बाद करत माघारी धाडले होते. कर्णधार ऑयन मॉर्गनच्या हाती झेल देत त्याने नबीला १४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

केन विलियम्सनला KKR विरुद्ध का दिली नाही संधी? संघ प्रशिक्षकाने सांगितले कारण

पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी फलंदाजाला बाद करणारा भारतीय गोलंदाज पाहतोय पुनरागमनाची वाट, म्हणाला…

तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहें! जेव्हा ‘हिटमॅन’ करू लागतो गोलंदाजीचा सराव, पाहा भन्नाट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---