भारतीय खेळाडू प्रवीण जाधवने टोकियो ऑलिंपिक २०२०च्या पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड १६ मध्ये निराश केले. त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसनने ६-० ने सहज मात दिली.
एलिसनने प्रवीणला २८-२७, २७-२६ आणि २६-२३ असे पराभूत केले. यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. (Pravin Jadhav lost 1/16 elimination round against USA’s Brady Ellison by 0-6)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Men's Individual 1/16 Eliminations ResultsAfter earlier knocking out World No. 2, archer @pravinarcher goes down against World No. 1 Brady Ellison 0-6. Spirited effort champ! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/m5DdlGJHAR
— Team India (@WeAreTeamIndia) July 28, 2021
तत्पूर्वी पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड ३२ मध्ये साताऱ्याच्या प्रवीणने चमकदार कामगिरी केली होती. त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियाच्या गलसान बाझरझापोव्हचा ६-० ने पराभव केला. त्याने गलसानला २९-२७, २८-२७ आणि २८-२४ अशी धूळ चारली होती.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?