विश्वविजेत्या 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जूनचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे.
या फोटो काही वर्षांपूर्वीचा असून यात अर्जून आणि पृथ्वी शेजारी उभे आहेत. तसेच या फोटोत पृथ्वीने अर्जूनच्या खांद्यावर हात टाकला आहे.
arjuntendulkar.official या इंस्टाग्राम अकाऊंटर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ७ तासांत या फोटोला ९०० लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच या अकाऊंटला ६हजार फाॅलोवर्स आहेत.
https://www.instagram.com/p/Bl4caGvgCfQ/?hl=en&tagged=prithvishaw
हे दोघेही देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून खेळतात. पण मुंबईकडून अर्जून वयोगटातील स्पर्धा खेळतो, तर पृथ्वी मुंबईच्या रणजी संघात आहे. या दोघांचे वयही सारखे आहे.
नुकतीच अर्जूनची श्रीलंका दौऱ्यातील चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली होती.पण त्याला या मालिकेत प्रभाव पाडता आला नाही. त्याने या मालिकेत त्याला 14 धावा आणि 3 विकेट्स घेता आल्या.
https://twitter.com/Arjun_T99/status/1023849099278176257
तसेच अजून अर्जूनला प्रथम श्रेणीचे आणि अ दर्जाचे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही.
The next Sachin Tendulkar? Mumbai schoolboy Prithvi Shaw hits record 546 in Under-16 Harris Shield match pic.twitter.com/ZMS2BZtmL2
— Sandeep Tripathi (@SandeepT_Ind) November 20, 2013
तर पृथ्वीने या वर्षाच्या सुरवातीला झालेला 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताचे नेतृत्व करताना विश्वचषकही मिळवून दिला आहे. त्याने केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याची भारताच्या अ संघात निवडही करण्यात आली आहे.
Youngest to score a Duleep Trophy Hundred
17yrs 262days – Sachin Tendulkar
17yrs 269days – Sachin Tendulkar
17yrs 320days – Prithvi Shaw pic.twitter.com/ikEjpf2NJv— Cricketopia (@CricketopiaCom) September 26, 2017
तसेच 19 वर्षांखालील संघाचा आणि भारतीय अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या पॉलिसीनुसार खेळाडूंना 19 वर्षांखालील एकच विश्वचषक खेळण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असेल तर त्याला मोठ्या स्पर्धांसाठी पुढच्या स्थरावर खेळवावे.
https://twitter.com/PremIsBackAgain/status/403131879450087424
पृथ्वीने आत्तापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळले असुन यात त्याने 6 शतके आणि 5 अर्धशतकांसह 57.36 च्या सरासरीने 1262 धावा केल्या आहेत.
याचबरोबर त्याने अ दर्जाचे 19 सामने खेळले आहेत यात त्याने 34.26 च्या सरासरीने 651 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–आम्ही या मैदानावर किंग आहोत, टीम इंडियाने पराभूत कण्याचा विचारही करु नये
–अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी
–मांजरेकर आज विराटला सल्ला देतायं, उद्या फेडररला देतील