---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सला धक्का! संघाचा हुकमी एक्का ‘पृथ्वी शाॅ’बाबत मोठी बातमी…

On: बुधवार, मार्च 16, 2022 8:22 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम (आयपीएल २०२२) सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व खेळाडू हळूहळू आपापल्या कॅम्पमध्ये जमा होऊ लागलेत. मागील तीन हंगामापासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही प्रमुख खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यासाठी उपलब्ध नसतील. त्याचवेळी संघाचा रिटेन केलेला युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पृथ्वी ठरला अपयशी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास २५ खेळाडूंना बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) बोलावण्यात आले होते. याठिकाणी या सर्व खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी एक असलेला पृथ्वी शॉ या चाचणीमध्ये तंदुरुस्ती सिद्ध करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे, तो आगामी आयपीएलमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करणार का? याबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अनेक खेळाडूंना बेंगलोर येथे बोलविण्यात आले होते. हे केवळ फिटनेस अपडेट आहे. पृथ्वी नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये सलग तीन सामने खेळला. अशाप्रकारे, सलग प्रथमश्रेणी क्रिकेट खेळल्यानंतर कधीकधी तितकीशी तंदुरुस्ती राहत नाही. पृथ्वी आयपीएलमध्ये खेळू शकतो. ‌कारण, तो सध्या भारतासाठी कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नाही.’

पृथ्वी खराब फॉर्म सततच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघ व्यवस्थापन मयंक अगरवाल याच्याकडे पर्याय म्हणून पाहतेय. पृथ्वी मागील वर्षीपर्यंत भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत होता.

तो २०१८ पासून दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. मागील दोन वर्षापासून तो दिल्ली संघाचा सलामीवीर म्हणून जबाबदारी पार पाडतोय. आयपीएल २०२२ पूर्वी रिषभ पंत, अक्षर पटेल व एन्रिक नॉर्किए यांच्यासह त्याला दिल्ली संघ व्यवस्थापनाने रिटेन केले होते.

महत्वाच्या बातम्या-

व्वा! मागे धावत हरमनप्रीतचा शानदार ‘हवाई’ झेल, कोलांट्या खाल्यानंतरही सोडला नाही चेंडू- Video 

लो जी हम आ गए! ‘यलो आर्मी’सोबत जोडला गेला जडेजा, सीएसकेने शेअर केला आगमनाचा Video

बाबो! रणजी ट्रॉफीत झारखंडची असाधारण कामगिरी, नागालँडवर तब्बल १००८ धावांची आघाडी; सामना मात्र.. 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---