प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौथ्या दिवशी (२५ डिसेंबर) पहिला सामना हा ‘पटणा पायरेट्स’ आणि ‘यूपी योद्धा’ संघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात यूपी योद्धांनी ३६-३५ च्या फरकाने विजय मिळवला आहे.
Sachin…Sachin… 👏👏👏
Some tunes never get old. Just ask @PatnaPirates tonight.#PATvUP #vivoProKabaddi #SuperhitPanga pic.twitter.com/F0P4FjuCzp
— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2021
हेही वाचा- प्रो कबड्डी २०२१: ‘बंगाल वॉरियर्स’चा सलग दुसरा विजय, ‘गुजरात जायंट्स’ला ३१-२८ ने नमवले
पटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात झालेल्या चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये पटणा पायरेट्स यूपी योद्धांपेक्षा ३ गुणांनी आघाडीवर होता. त्याने पहिल्या हाफअंती २०-१७ ने आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या हाफमध्ये यूपी योद्धांनी जबरदस्त प्रदर्शन करत सामन्यात पुनरागमन केले. एकवेळ ३ गुणांनी मागे असलेल्या यूपी योद्धांनी पटणा पायरेट्ससोबत २५-२५ ने बरोबरी साधली होती. पुढे हेच प्रदर्शन कायम ठेवत त्यांनी ३६-३५ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार
मला विसरलात, तर परत माझी आठवण करून देईल; ‘या’ खेळाडूचा आपल्याच क्रिकेट बोर्डाला टोला
हेही पाहा-