इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम तोंडावर आला आहे. ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांमध्ये हंगामाची पहिली लढत पाहायला मिळणार आहे. एकूण ५२ दिवस चालणाऱ्या आयपीएल २०२१ चा अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. या हंगामात प्रत्येक संघ अंतिम फेरी गाठण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र मागील काही हंगामातील कामगिरी पाहता, काही संघ आपल्या प्रदर्शनातील सातत्या कायम राखत अंतिम सामन्यात धडक मारू शकतात. या लेखात आपण चौदाव्या हंगामात अंतिम फेरी गाठू शकणाऱ्या चार संघाचा आढावा घेऊया.
४) सनरायझर्स हैदराबाद –
साल २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने गेल्या काही वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्या हाती आहे. तसेच या संघात न्यूझीलंड संघाचा केन विल्यमसन देखील आहे. या दोघांच्या अनुभवामुळे युवा खेळाडूंना फायदा होत असतो. टी-२० क्रिकेट स्पेशालिस्ट गोलंदाज राशीद खान देखील याच संघात आहे. हैदराबाद संघाने आयपीएल २०२० स्पर्धा तिसऱ्या क्रमांकावर समाप्त केली होती. त्यामुळे येणाऱ्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो.
३) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ २०२० आयपीएल स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होता. फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहलीला साथ देण्यासाठी एबी डिवीलियर्स आहे. तसेच नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात आरसीबी संघाने ग्लेन मॅक्सवेल याला १४.२५ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे या संघाची ताकद आणखीन वाढली आहे. याव्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देवदत्त पड्डीकल याने सलग चार शतक झळकावले आहे. त्यामुळे आरसीबी संघाची फलंदाजी मजबूत दिसत आहे. याचा फायदा त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी नक्की होऊ शकतो.
२) चेन्नई सुपर किंग्स –
आयपीएल इतिहासात तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या, चेन्नई सुपर किंग्स संघाला युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत प्लेऑफ गाठण्यास अपयश आले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ, आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ लिलावात चेन्नई संघाने मोइन अलीला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. तसेच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चेन्नई संघाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने देखील शतकीय खेळ्या केल्या आहेत. त्यामुळेच चेन्नई संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत खेळताना दिसू शकतो.
१) मुंबई इंडियन्स –
आयपीएलच्या इतिहासात पाच वेळा विजेतेपद पटकावणारा संघ यावेळेस देखील अंतिम फेरी गाठू शकतो. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. ज्याच्या नावे ५ आयपीएल जेतेपद आहेत. तसेच या संघात अनेक स्टार खेळाडू देखील आहेत, जे या संघासोबत कित्येक वर्षांपासून जोडले गेले आहेत. यावेळी देखील मुंबई संघ त्याच जोशमध्ये सहावे जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या संघात सलामीसाठी रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांसारखे आक्रमक फलंदाज आहेत. तर हार्दिक पंड्या आणि कायरोन पोलार्ड यांसारखे लांबच लांब षटकार मारणारे खेळाडू आहे. तसेच यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टदेखील या संघात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी! दुसर्या वनडे सामन्यात भारताचा आफ्रिकेवर सफाईदार विजय
चेसमास्टर स्मृती! धावांचा पाठलाग करतांना कुठल्याही क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम केला आपल्या नावे
पृथ्वी वादळापुढे सौराष्ट्र नेस्तनाबूत! मुंबईचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश