इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा चौथा सामना सोमवार रोजी (१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार आहे. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. राजस्थानचा नवनियुक्त कर्णधार संजू सॅमसन याच्यापुढे पंजाबचा कर्णधार केएल राहुल याचे आव्हान असणार आहे. अशात या संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? याची चिंता सर्वांना सतावत आहे.
राजस्थान संघाकडून बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांना सलामीला संधी मिळू शकते. तर कर्णधार सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊ शकतो. मधल्या फळीत रियान पराग, राहुल तेवतिया, शिवम दुबे आणि ख्रिस मॉरिस फलंदाजी करताना दिसू शकतात. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी श्रेयस गोपालच्या खांद्यावर असेल. तर मुस्तफिजुर रेहमान, जयदेव उनाडकट आणि कार्तिक त्यागी या वेगवान गोलंदाजांना अंतिम ११ जणांमध्ये संधी दिली जाईल.
दुसरीकडे पंजाब संघाच्या डावाची सुरुवात कर्णधार राहुल आणि फलंदाज मयंक अगरवाल करतील. तिसऱ्या क्रमांकावर अनुभवी ख्रिस गेल आणि डेविड मलान यांना संधी दिली जाऊ शकते. तर मधल्या फळीत निकोलस पूरन, शाहरुख खान, सरफराज खान आणि दिपक हुड्डा खेळताना दिसतील. फिरकी गोलंदाजी विभागात मुरगन अश्विन आणि रवि बिश्नोई यांना जागा दिली जाईल. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि झाय रिचर्डसन वेगवान गोलंदाजी विभागात असतील.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, रियान पराग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट.
पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, मोसेस हेन्रिक्स, सरफराज खान, शाहरुख खान, मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंह.
महत्त्वाच्या बातम्या-
कोलकाताची १० धावांनी हैदराबादवर मात, कर्णधार वॉर्नरने ‘यांना’ पराभवासाठी धरले जबाबदार
‘काय सुरुवात होती,’ पृथ्वी शॉच्या सुपरहिट फलंदाजीची गर्लफ्रेंडलाही पडली भुरळ; केली स्तुती
SRH विरुद्ध ‘भज्जी’ने केवळ एक षटक केली गोलंदाजी; कर्णधार मॉर्गनने सांगितले यामागचे कारण