संपुर्ण नाव- अशोक कुर्जीभाई पटेल
जन्मतारिख- 6 मार्च, 1957
जन्मस्थळ- भावनानगर, गुजरात
मुख्य संघ- भारत आणि सौराष्ट्र
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 28 सप्टेंबर, 1984, ठिकाण – नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 6, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 7, सर्वोत्तम कामगिरी- 3/43
थोडक्यात माहिती-
-अशोक पटेल हे भारताचे फिरकीपटू गोलंदाज होते. 1980च्या दशकात भारतीय संघात अनेक फिरकीपटू गोलंदाज असल्यामुळे त्यांना त्याकाळात उल्लेखनीय कामगिरी करणे महत्त्वाचे होते. त्यांना कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फक्त वनडेपुरती मर्यादीत होती.
-भावनानगर येथे जन्मलेल्या पटेल यांनी सौराष्ट्र संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली होती. त्यांनी सौराष्ट्र संघाकडून 22 वर्षांखालील क्रिकेट खेळले होते.
-त्यानंतर त्यांनी 1979-80मध्ये प्रथम श्रेणीतील पदार्पणही सौराष्ट्र संघाकडूनच केले होते. यावेळी त्यांनी पहिल्या 4 प्रथम श्रेणी हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली होती. यादरम्यान त्यांनी 19 विकेट्स घेतल्या होत्या. तर, 6 अर्धशतके ठोकली होती.
-रणजी ट्रॉफीच्या 1983 ते 84च्या हंगामात पटेल यांनी पदार्पणाच्या सामन्यातच गुजरातच्या फलंदाजांच्या 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यापुढील बडोदाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी पुन्हा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
-तसे पाहिले तर, पटेल यांच्यासाठी 1983-84हे वर्ष विशेष ठरले होते. याकाळात त्यांनी 7 रणजी हंगामात 25 विकेट्सघेतल्या होत्या. शिवाय याचवर्षी त्यांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही झाले होते.
-जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी वनडेत पदार्पण केले होते. यावेळी त्यांनी कीम ह्यूजेस यांची एकमेव विकेट घेतली होती. त्यानंतर त्यांना वनडे मालिकेच्या उर्वरित सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
-इंदोर येथील आपल्या वनडे कारकिर्दीतील 5व्या वनडेत पटेल यांनी 43 धावा देत सर्वोत्कृष्ट 3 विकेट घेतल्या होत्या. तरीही ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला होता.
-त्यांना पाकिस्तान दौऱ्यावर संधी मिळाली नव्हती. मात्र, त्यांनी इंग्लंड दौऱ्यावर 1984-85मध्ये 3 वनडे सामने खेळले होते. यावेळी त्यांनी अवघ्या 2 विकेट घेता आल्या होत्या. त्यापुढे त्यांना एकाही वनडेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती.