पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) रोमांच सुरू असून अनेक धक्कादायक निकाल प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. असाच एक सामना इस्लामबाद युनायटेडविरुद्ध लाहोर कलंदर संघांमध्ये बघायला मिळाला. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करतांना इस्लामाबादने फक्त 20 धावांवर 5 बळी गमावून देखील सामना जिंकला त्याचवेळी लाहोर संघ 55 धावांवर 1 बळी अशा सुस्थितीत असताना देखील हा सामना हरला.
पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद युनायटेडने लाहोर कलंदर विरुद्धच्या सामन्यात केलेले पुरागमन हे टी20 तसेच या पीएसएल स्पर्धेच्या सर्वात शानदार पुनरागमन ठरले. प्रथम फलंदाजी करायला उतरलेला इस्लामाबादचा संघाने 6.1 षटकातच 20 धावांवर आपले महत्वपूर्ण 5 बळी गमावले. उस्मान ख्वाजा, रोहेल नाजीर, कुलीन मुन्रो, हुसेन तलात आणि कर्णधार शादाब खान हे सगळे फलंदाज दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाही. परंतु तरिदेखील नंतर या संघाने जोरदार पुरागमन करीत विजय मिळवला.
इस्लामाबादच्या इफ्तीखार अहमद आणि असिफ अली या दोघांनी शानदार फलंदाजी करीत संघाला पुन्हा सामन्यात आणले होते. ते फक्त इस्लामबादला सामन्यात परत घेऊनच आले नाही तर त्यांनी संघाला 152 धावांपर्यंत पोहचवत लाहोर समोर 153 धावांचा सन्मानजनक लक्ष्य उभे केले.
Kya comeback hai! @IsbUnited did the impossible today and stole the victory from @lahoreqalandars’s hands 🙌🏼 #MatchDikhao l #HBLPSL6 l #IUvLQ pic.twitter.com/s19raVsgLI
— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 13, 2021
इस्लामाबादने ज्या प्रकारे डावाची सुरवात केली होती, त्यामुळे तो संघ 100 धावांपर्यंत पोहोचेल की नाही, याबद्दल शंका होती, कारण एकही खेळाडु 9 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करू शकला नव्हता. अशामध्ये अहमद आणि अलीने 76 चेंडूवर 123 धावांची शानदार शतकीय भागीदारी करून सामन्याचे चित्र पालटले. अहमदने 37 चेंडूवर 6 चौकरांच्या मदतीने 49 धावा केल्या तर अलीने 43 चेंडूत 6 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 75 धावा जोडल्या. संघाचे स्टार खेळाडू ख्वाजा 0 , कुलीन मुन्रो 4 धावाच करू शकले.
लक्ष्याचा पाठलाग करतांना लाहोरने आश्वासक सुरवात केली, परंतु 55 धावांवर त्यांना कर्णधार सोहेल खानच्या रुपात पहिला झटका बसला. त्यानंतर लाहोरचा संघ गडगडला आणि 18.2 षटकात हा संघ 124 धावांवरच गारद झाला. इस्लामाबादने हा सामना 28 धावांनी या सामन्यात विजय मिळवला. लाहोरतर्फे सर्वाधिक धावा 44 या फखर जमानने केल्या तर सोहेल अख्तरने 34 धावा केल्या. इस्लामाबादकडून मुहम्मद मुसाने 3 बळी आणि फवाद अहमद आणि शदाब खानने प्रत्येकी 2 बळी टिपले.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्शदीप सिंग म्हणतोय, श्रीलंका दौऱ्यादरम्यान ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीला करायचे आहे इंप्रेस
क्रिकेट खेळणाऱ्या लहानग्या मुलीच्या व्हिडिओवर ‘अशी’ प्रतिक्रिया देत मिताली राजने जिंकली लाखो मनं
जगभरात आपल्या फलंदाजीचा डंका वाजवलेल्या गावसकरांसाठी भारतातील ‘ही’ खेळपट्टी ठरली होती त्रासदायक