---Advertisement---

अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूचा पाकिस्तानला झटका! PSL मधून घेतली माघार

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 8:01 PM
Afganistan Cricket Team
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2026 संपल्यानंतर लगेचच ‘पाकिस्तान सुपर लीग’ (PSL) 2026 ला सुरुवात होणार असून त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र, स्पर्धेपूर्वीच अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullahh gurbaaj) याने या हंगामातून आपले नाव मागे घेतले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यामागचे कारणही स्पष्ट केले आहे.

5 फेब्रुवारीला ‘पेशावर जल्मी’ संघाने गुरबाजला आपल्या संघात सामील केले होते, पण अवघ्या दोन दिवसांतच त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्याने लिहिले, विश्वचषकानंतरच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी या हंगामात पीएसएलसाठी उपलब्ध नसेन. मला आता अफगाणिस्तानमधील माझ्या ‘फाउंडेशन’च्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.

गुरबाजला पेशावर जल्मीने संघात घेतल्यावर काही चाहते नाराज होते. गुरबाजने गेल्या वर्षी पाकिस्तानविरोधी पोस्ट केल्याचा आरोप काही चाहत्यांनी केला होता. यामुळे पेशावर जल्मीचे मालक जावेद आफ्रिदी यांच्यावरही टीका झाली होती, तर काहींनी गुरबाजने माफी मागावी अशी मागणी केली होती.

गुरबाजने आतापर्यंत पीएसएलमध्ये 3 हंगाम खेळले आहेत. 2021 मध्ये मुल्तान सुल्तान्स, तर 2022 आणि 2023 मध्ये तो इस्लामाबाद युनायटेडकडून खेळला होता. या दरम्यान 15 सामन्यांत त्याने 159.79 च्या स्ट्राईक रेटने 318 धावा केल्या आहेत. तसेच गुरबाज आयपीएल 2026 च्या लिलावात सहभागी होता, पण कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---