सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पीएसएलच्या आठव्या हंगामाची सुरुवात 9 फेब्रुवारी 2023 पासून होणार असून अंतिम सामना 19 मार्च 2023ला खेळवला जाईल. ऑस्ट्रलियाच्या मॅथ्यू वेड आणि ऍरोन फिंच यांच्याबरोबरच 500पेक्षा जास्त परदेशी खेळाडूंनी प्लेयर्स ड्राफ्टमध्ये आपली नावे नोंदवली आहेत.
पीएसएलच्या आठव्या हंगामाचा प्लेयर्स ड्राफ्ट 15 डिसेंबरला कराची येथे आयोजित केला जाईल. या संघात एकूण 6 संघ सहभागी होतात. माध्यमांच्या अहवालानुसार पीएसएलच्या प्लेयर्स ड्राफ्टमध्ये सर्वात जास्त 138 इंग्लंडच्या खेळाडूंनी आपली नाव नोंदणी केली. याव्यतिरिक्त बाकीच्या देशाच्या खेळाडूंची यादी खालील प्रमाणेे
अफगणिस्तान- 46
ऑस्ट्रेलिया- 16
बांगलादेश- 30
न्यूझीलंड- 6
दक्षिण आफ्रिका- 26
श्रीलंका – 62
झिम्बाब्वे- 11
वेस्ट इंडिज – 40
पीएसएलच्या प्लॅटीनम कॅटेगरीत समावेश करण्यात आलेले खेळाडू खालील प्रमाणे-
ऍरोन फिंच. मॅथ्यू वेड, शाकिब अल हसन, ऍलेक्स हेल्स, डेेवि़ड विली, डेविड मलान, मोईन अली, जिमी नीशम, डेविड मिलर, आदिल राशिद, भानुका राजपक्षे, दसुन शनाका, वनिंदु हसरंगा, कायरन पोलार्ड, मुजिब उर रेहमान, मोहम्मद नबी, मार्टिन गप्टील, लुंगी एनगिडी आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम
पीएसएलच्या डायमंड कॅटेगरीतील खेळाडू-
इमरान ताहिर, साकिब मेहमूद, जेम्स विंस, तमीम इकबाल, मुशफिकुर रहीम, हजरतुल्लाह झझई, विल जॅक्स, रीझा हेंड्रिक्स, शे होप, सिकंदर रझा, फवाद एहमद, कार्लोस ब्रेथवेट,
याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा ज्युनिअर डला आणि टेंबा बवुमा या खेळाडूंना गोल्ड कॅटेेगरीत ठेवले आहे. शाकिब अल हसन, मोईन अली आणि डेविड विली यांच्यासहित उर्वरीत बांगलादेश आणि इंग्लंड संघाचे खेळाडू काही काळासाठी उपलब्ध असणार आहेत, कारण त्यानंतर दोन्ही देशांचे खेळाडू द्विपक्षीय मालिकेत व्यस्त असणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि वेेस्ट इंडिज देशाचे खेळाडू देखील काही काळासाठी उपलब्ध असतील, कारण फेब्रुवारीमध्ये दोन्ही संघाना द्विपक्षीय मालिका खेळायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिंताजनक! विकेटकीपिंग करताना पाकिस्तानी खेळाडूला दुखापत, डोक्याला चेंडू लागल्यानंतर स्ट्रेचरवरून नेले मैदानाबाहेर
चट्टोग्राममध्ये पूर्ण पाच दिवसांचा खेळ होईल? जाणून घ्या खेळपट्टी, हवामानासह सर्व काही