भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी यावर्षीचा काउंटी हंगाम चांगलाच फलदायी ठरला आहे. काउंटीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत त्याने भारतीय संघात पुनरागमन केले होते. त्यानंतर त्याला मंगळवारी (१९ जुलै) ससेक्सचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात उतरताना त्याने त्या सामन्याला अविस्मरणीय बनवत शानदार शतक ठोकले.
पुजारा बनला कर्णधार
ससेक्सचा नियमित कर्णधार टॉम हेन्स दुखापतीमुळे ५ ते ६ आठवडे मैदानाबाहेर राहणार आहे. हे पाहता ससेक्सने त्यांचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. मिडलसेक्सविरूद्धच्या लॉर्ड्सवरील सामन्यात तो कर्णधार म्हणून मैदानात उतरला. मिडलसेक्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ससेक्सने आपले दोन्ही सलामीवीर ९९ धावांवर गमावले. त्यानंतर पुजारा व टॉम अलसॉप ही जोडी जमली. दोघांनीही विरोधी गोलंदाजांना डोकेवर न काढू देता संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. अलसॉप १३५ धावा काढून बाद झाला. मात्र, पुजाराने एक बाजू लावून धरत स्वतःचे शतक पूर्ण केले. त्याचे हे या काउंटी हंगामातील पाचवे शतक ठरले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ससेक्सची धावसंख्या ४ बाद ३२८ अशी झाली होती. पुजारा ११५ तर ऑलिव्हर कार्टर ५ धावांवर नाबाद आहे.
Close of play on day one. 🙌
[328-4] #GOSBTS pic.twitter.com/p7bDGxbddB
— Sussex Cricket (@SussexCCC) July 19, 2022
Pujara doing what he does best, scoring runs. 💯@cheteshwar1 👏 pic.twitter.com/NiKOkV6dct
— Sussex Cricket (@SussexCCC) July 19, 2022
याच सामन्यात मिडलसेक्ससाठी खेळणारा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याला मात्र पहिल्या दिवशी एकही बळी घेण्यात यश आले नाही. अन्य एका सामन्यात भारताचा युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने लॅंकेशायर काउंटीसाठी पदार्पण केले. त्याने आपल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशीच चमकदार कामगिरी करत ४ बळी आपल्या नावे केले. दुसऱ्या दिवशी आणखी एक बळी मिळवल्यास तो काउंटी पदार्पणात पाच बळी घेण्याचे ऐतिहासिक कामगिरी करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेरच्या वनडेत उतरताच स्टोक्सच्या डोळ्यात तरळले अश्रू! पाहा भावूक करणारा व्हिडिओ
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला
श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”