पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून दि. २९ व ३० डिसेंबर २०१७ रोजी श्री शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल, योगासने, कुस्ती, बुद्धिबळ, तायक्वांदो, बुडो मार्शलआर्ट व मैदानी स्पर्धा तसेच वक्तृत्व, निबंध, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक स्पर्धां होणार आहेत. संस्था गटपातळीवर व तालुका पातळीवर ११२१८ खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूपैकी जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांमध्ये ४०६० खेळाडू सहभागी होणार आहेत. अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदिप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा शैक्षणिक विकास व क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा, संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा विषयक उत्साह निर्माण करण्यासाठी व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून संस्थेचे नाव लौकिकात भर पडण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या पाच वर्षांपासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून संस्थेमार्फत संस्थेचे आधारस्तंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडानगरीत जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
संस्थेच्या सर्व शाखामधून शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता खेळासाठी प्रोत्साहीत केले जाते. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा कौशल्याचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होत आहे. याचा परिणाम म्हणून संस्थेच्या विविध शाखामधून शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी-खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पर्धांमधून यश संपादन करीत आहेत. या स्पर्धा २०१२-१३ सुरु झाल्यापासून आजतागयत एशिया, श्रीलंका, मॉस्को, सिंगापूर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, बँकॉक, थायलंड इत्यादी राष्ट्रांमध्ये खेळाडूंनी विविध स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर १५ सुवर्ण पदके, २ रौप्य, ६ कास्य पदके व ३९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर राष्ट्रीय पातळीवर ४८ सुवर्ण पदके, १० रौप्य, २२ कास्य पदके व ११९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी केली आहे.
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून बाबुराव घोलप यांनी ७ सप्टेंबर १९४१ रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळची स्थापना केली. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी खेड्यापाड्यात शाखा सुरु केल्या. या कामात त्यांना श्रीमती शारदाबाई पवार, मामासाहेब मोहोळ, अण्णासाहेब आवटे, शंकरराव भेलके, यांनी सहकार्य केले. पुढे प्रा.रामकृष्ण मोरे यांनी संस्थेचा विस्तार केला आणि आज विद्यमान अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची गुणात्मक वाढ होत आहे.
या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धांचे उद्घाटन शुक्रवार दि. २९ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या शुभहस्ते होणार असून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ. सुनेत्राताई पवार, अभिषेक बोके -सिनेट सदस्य मा. बाळासाहेब लांडगे, सिने अभिनेत्री श्वेता शिंदे, तसेच सदर कार्यक्रमास खासदार सौ. वंदनाताई चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मा. विश्वासराव देवकाते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, अंकुश काकडे, जालिंदर कामठे, रमेशआप्पा थोरात, सतिश मगर, चेतन तुपे, सौ. रुपाली चाकणकर तसेच स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्सहान देण्यासाठी आजी माजी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू वशिव छत्रपती आणि अर्जुन पुरस्कारविजेते खेळाडू उपस्थित राहणार आहेत
सदर कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण पै. अभिजित कटके महाराष्ट्र केसरी किताब मिळवला म्हणून त्याचा संस्थेच्या वतीने माण्यावाराच्या हस्ते जाहीर सत्कार करणार आहे.
युवकांना सायकल वापरासाठी उद्युक्त व प्रोत्साहित करण्यासाठी सर्वसामान्यांना परवडणारे हे वाहन असल्याने लोकांनी त्याचा वापर वाढवावा यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने गेली तीन वर्षे पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे पर्यावरणसंवर्धन, प्रदूषण, वाहतूक नियंत्रण, मुलगी वाचवा, स्वच्छता अभियान यासारखे विविध संदेश देऊन समाजात जाणीव जागृती करण्यात येते. या राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू भाग घेतात. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. त्यातून आमच्या संस्थेतील खेळाडूंची राज्यस्तरावर निवडही झाली आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदिप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सर्व प्राचार्य, शाखाप्रमुख, क्रीडा शिक्षक यांच्या अथक परिश्रमातून या क्रीडा स्पर्धा साकार होणार आहेत.