नुक्यातच पार पडलेल्या सर्वेक्षणानुसार फिटनेस मध्ये पुण्याने देशभरात अव्वल क्रमांक पटकावला आहे. रिबॉकने घेतलेल्या फिटनेस सर्व्हे मध्ये ही बाब समोर आली. पुण्यापाठोपाठ दुसऱ्या नंबरवर चंदिगडने शिक्कामोर्तब केला. चंदीगडमध्ये धावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे तर योग बाबतीत देखील जागरूकता चांगली आहे.
सर्वेक्षणानुसार भारतात एकूण ६०% लोक हे आठवड्याभरात ४ तासापेक्षा अधिक काळ व्यायामाकरीता देतात, आणि त्यात सर्वाधिक संख्या आहे ती पुणेकरांची
सर्वेक्षणात १५०० महिला व पुरुष २०-३५ वयोगटातून भारतातील ८ राज्यांच्या शहरातून निवडण्यात आले होते. या मध्ये पुण्याला सर्वाधिक म्हणजे ७.६५ % फिटस्कोर मिळाला आणि चंदीगडला ७.३५ % इतका स्कोर मिळाला. यामध्ये व्यायामासाठी दिलाजाणारा वेळ, करण्यात येणारे व्यायामाचे प्रकार इत्यादी गोष्टींची नोंद ठेवण्यात आली होती.
दाक्षिण्यात्य शहरांमध्ये मात्र फिटनेसचा सगळा आनंद आहे असे दिसून आले. हैदराबाद, बंगलोर, चेन्नई या सर्व शहरांना सर्वात कमी फिटनेस स्कोर मिळाला.
या सर्व्हेमुळे पुणेकरांचा उत्साह नक्कीच वाढला असेल आणि आणखी तरुण तरुणी नव्या जोमाने व्यायामाला लागतील हे नक्की.