---Advertisement---

‘छोटी बच्ची हो क्या!’ म्युझिकवर शिखर धवनने मालकिणीसोबत केला वर्कआऊट, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

On: मंगळवार, मे 10, 2022 6:37 PM
Shikhar-Dhawan-And-Preity-Zinta
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली अग्रस्थानी आहे. मात्र, विराटचा हा विक्रम मोडण्यासाठी शर्यतीत शिखर धवन दुसऱ्या स्थानी आहे. आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडण्याव्यतिरिक्त धवन त्याच्या मजेशीर अंदाजासाठीही ओळखला जातो. तो नेहमीच मस्तीच्या अंदाजात दिसतो. सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या अधिकतर पोस्ट या मजा-मस्तीच्याच असतात. अशात त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पंजाब किंग्स संघाची सह-मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्यासोबत दिसत आहे.

या व्हिडिओत शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि प्रीती झिंटा (Preity Zinta) जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत. सोबतच ते मजा- मस्ती करतानाही दिसत आहे. धवनने या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये मीम्सचे प्रसिद्ध म्युझिक वापरले आहे. हे म्युझिक हिरोपंती सिनेमातील टायगर श्रॉफचा डायलॉग आहे. ज्यात तो म्हणतो की, ‘छोटी बच्ची हो क्या’ सोशल मीडियावर या व्हिडिओला तुफान प्रसिद्धी मिळत आहे. आतापर्यंत २५ लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.

https://www.instagram.com/reel/CdXjzZuovtN/?utm_source=ig_embed&ig_rid=c0a73c52-795a-4533-9226-b2a37c0809d1

आयपीएलमध्ये शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन आयपीएलच्या या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत ११ सामन्यात फलंदाजी करताना ४२.३३च्या सरासरीने ३८१ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ अर्धशतकेही झळकावली आहेत. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्लेऑफच्या शर्यतीत पंजाबही सामील
पंजाब किंग्स संघाने या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. या सामन्यांपैकी त्यांनी फक्त ५ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ६ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर उर्वरित ३ सामने जिंकावे लागतील. यादरम्यान जर त्यांनी एक सामना गमावला, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. गुणतालिकेत पंजाब संघ १० गुणांसह आठव्या स्थानी आहे.

पंजाब किंग्सला आयपीएलमध्ये एकदाही विजेतेपद जिंकता आले नाहीये. त्यामुळे आता या हंगामात तरी पंजाब संघ आयपीएलचा किताब आपल्या नावावर करेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

पोराची बातच न्यारी! थेट चालू सामन्यातच स्कूटर घेऊन घुसला मैदानात, पाहायला मिळाला विचित्र नजारा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विराटचा पत्ता होणार कट? निवडकर्ते करणार कोहलीशी चर्चा

क्रिकेटर नसता, तर ‘हे’ काम करून देशाची सेवा केली असती; दिल्लीच्या ‘दबंग’ खेळाडूचा मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---