इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. रविवारी (दि. २२ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना पंजाबने ५ विकेट्सने जिंकला. या विजयाचा हिरो लियाम लिविंगस्टोन ठरला. त्याने चांगली फटकेबाजी केली. तसेच, हरप्रीत ब्रार याला त्याच्या गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पंजाबने हा विजय मिळवला असला, तरीही हे दोन्ही संघ हंगामातून आधीच बाहेर पडले आहेत.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा प्रभारी कर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी हैदराबादने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत १५७ धावा चोपल्या. हे धावांचे आव्हान पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.
That's that from Match 70 as @PunjabKingsIPL end their campaign on a winning note. Win by 5 wickets in 15.1 overs.
Scorecard – https://t.co/MmucFYpQoU #SRHvPBKS #TATAIPL pic.twitter.com/ujbQsZaUMz
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
पंजाबकडून फलंदाजी करताना लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) चांगलाच चमकला. त्याने २२ चेंडूत नाबाद ४९ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त शिखर धवन याने ३९, जॉनी बेअरस्टो याने २३, शाहरुख खान आणि जितेश शर्मा यांनी प्रत्येकी १९ धावांचे योगदान दिले.
यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना फजलहक फारूकी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर, जगदीश सुचिथ आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी १ विकेट खिशात घातली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३२ चेंडूत ४३ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ५ चौकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त रोमारियो शेफर्ड याने नाबाद २६ धावा, वॉशिंग्टन सुंदर याने २५ धावा, एडेन मार्करम याने २१ धावा आणि राहुल त्रिपाठी याने २० धावा केल्या. तसेच, प्रियम गर्ग ४, कर्णधार भुवनेश्वर कुमार १ आणि जगदीश सुचिथ शून्य धावेवर बाद झाला.
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) आणि नेथन एलिस यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच, कागिसो रबाडा याने १ विकेट आपल्या नावावर केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सातत्य फळाला आले! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी उमरान मलिकची भारतीय संघात निवड
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ‘हा’ फलंदाज करणार पदार्पण, रणजी ट्रॉफीत झळकावलंय त्रिशतक






